सफाईची कामे करणाºया कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाºया सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले जात असेल तर, त्यांनाही सफाई कामगार संबोधून सर्व लाभ देण्यात येतील. डोक्यावरून मैला वाहण्याचे काम केलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य दिले जाईल. वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी केल्यामुळे हजारो सफाई कामगारांच्या कुटुंबीयांची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली आहे. सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपसमिती नेमण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली समितीने याबाबत निर्णय घेतला आहे.

हक्काची घरे देण्याबाबत निर्णय घ्यावा

सफाई कामगारांच्या जागी त्यांचा वारस नियुक्त होत असल्यामुळे अशा कामगारांनामोफत मालकी हक्काची घरे देण्याबाबत नगर विकास, ग्रामविकास, गृह निर्माण त्वरित निर्णय घेण्याचेही या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

नोकरीत प्राधान्य

शौचालय स्वच्छता, घाणीशी संबधित मलनि:सारण व्यवस्था, नाली गटारे, ड्रेनेज तसेच रुग्णालय आणि शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणारे अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग तसेच सफाई कामगारांच्या व्याह्ययेत बसणारे सर्व कामगार आणि पूर्वी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम केलेल्यांच्या वारसांना सरकारी

वारस कोण असेल?

पती किंवा पत्नी, मुलगा किंवा मुलगी, सून किंवा जावई, विधवा मुलगी, बहीण, घटस्फोटीत मुलगी किंवा बहीण, अविवाहित सज्ञान मुलगी किंवा अविवाहित सज्ञान बहीण, अविवाहित सफाई कर्मचाºयाचा सह्यखा भाऊ किंवा सह्यखी बहीण, नात किंवा नातू यांना वारसा हक्काने नोकरीसाठी पात्र समजले जाईल. अशांचे वय किमान १८ वर्षे व कमाल ४५ वर्षे असावे. स्वेच्छानिवृत्तीसाठी किमान १५ वर्षे सेवा करणे बंधनकारक राहील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *