वाघ आणि अस्वलाच्या अवशेषासह लाखोंचा रोकड जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पोलिसांनी संयुक्तरित्या पहाटे ५ वाजता देवरी : तालुक्यातील पालांदूर जमी. येथील एका घराच्या झडतीत वाघ व अस्वलाच्या अवशेषासह लाखो रुपयांची रोकड मिळाली. ही कारवाई आज, २६ फेब्रुवारी पहाटे ५ वाजता चिचगड वनविभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या करुन आरोपीला अटक केली. तालुक्यातील चिचगड परिसर संरक्षीत जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात वन्यजीव असून परिसरात नेहमीच वावर राहतो. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार व तस्करीच्या घटनांची भीती नेहमीच राहते. अशातच आज, २६ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील पालांदूर जमी. येथे वन्यप्राण्याची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली.

चिचगड वनविभाग व रवि बोडगेवार (५०) यांच्या घराची झडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्या घरात एका पोत्यात वाघाचे दात व नखे, अस्वलाची कलेजी आणि अंदाजे २१ लाख रुपयांची रोडक मिळून आली. तसेच बोडगेवारच्या घरात ८४ हजार रुपये किमतीच्या २२ पेट्या देशी दारुही आढळली. दरम्यान वनविभाग व पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतले असून बोडगेवारला अटक केली आहे. पुढील तपासात वन्यप्राण्यांच्या शिकार व तस्करी प्रकरणाचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *