लम्पी आजारांपासून जनावरांना वाचवण्यासाठी राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा-पटोले

मुंबई : अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेले आहे. राज्यात लम्पी आजाराची लागण हजारो जनावरांना झाली असून राज्य सरकारकडून त्यावर तातडीने कृती कार्यक्रम आखून तात्काळ अंमलबजवाणी करावी तसेच लम्पी आजाराने ज्यांची जनावरे दगावली आहेत त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील काही भागातील जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. हा रोग जास्त पसरू नये यासाठी वेळीच औषधोपचार करणे व हा रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे. लम्पी आजारावर आवश्यक लसीचा साठा राज्य सरकारने कउटफ कडून छ४ेस्र८ ढ१ङ्म५ंू कठऊ लसींचा साठा मागवावा. तसेच जनावरांना लम्पीची लागण होताच उपचार करण्यासाठी लागणारी औषधे राज्य सरकारने केंद्र सरकारडून कडून किंवा खुल्या बाजारातून विकत घ्यावीत. लम्पी आजारावर जर वेळीच नियंत्रण मिळवता आले नाही तर राज्यातील पशुधनाला मोठा फटका बसून शेतकºयांचेही नुकसान होऊ शकते.

भविष्याती धोका लक्षात घेता सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे परंतु राज्यातील शिंदे फडणीस सरकार गणेशोत्सवात व्यस्त होते आणि अजूनही हार तुरे सत्कार यातच त्यांचा वेळ जात भंडारा पत्रिका / प्रतिनिधी असल्याचे दिसते. सरकारने तातडीने पावले उचलून लम्पी आजारापासून पशुधन वाचवण्यास प्राधान्य द्यावे. अतिवृष्टीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले परंतु राज्य सरकार त्यांना भरीव आर्थिक मदत देऊ शकले नाही. सरकारने जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे आमि तीही अद्याप शेतकºयांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित सरकार शेतकरी विरोधी आहे हे दिसून आले आहे परंतु शेतकरी जगला तरच आपण जगू, शेतकºयाकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते म्हणून राज्य सरकारने लम्पी आजारापासून पशुधन, दुग्धव्यवसाय व शेतकरी यांना वाचवावे असेही पटोले म्हणाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *