आयुष्यमानभव आरोग्य सेवेचा शासकीय ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे उद्घाटन सोहळा

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ३१ डिसेंबरपर्यंत मोहाडी तालुक्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला एकाच आरोग्य संस्थेत विविध आरोग्य योजनांचा लाभ मिळावा हे या मोहिमेचे उद्दिष्ट असून, यासाठी आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे. आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत’आयुष्मान आपल्या दारी या उपक्रमांतर्गत मोहाडी तालुक्यातील ‘आयुष्मान कार्ड’चे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून कार्डवाटप करण्यात येणार आहे. ‘आयुष्मान सभा’या उपक्रमांतर्गत गावपातळीवर आरोग्य सेवा, सुविधांची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत वग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती यांचेमार्फत मोहीम राबविण्यात येते.

या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट ‘आयुष्मान कार्ड’ व ‘आभा कार्ड’ बाबत जनजागृती करणे, आरोग्यवर्धिनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल,लसीकरण, क्षयरोग व कुष्ठरोग आदींबाबत जनजागृती करणे तसेचआरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर मिळणाºया सेवा-सुविधांचे मूल्यमापन करणे आहे. आयुष्मान मेळाव्यात आयुष्मान भारत आरोग्यवर्धिनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवारी थीमनुसार उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येतील. या मेळाव्यादरम्यान आयुष्मान कार्ड व आभा कार्ड तयार करणे, सर्व समावेशक करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शनिवार दि.४ नोव्हेंबर २०२३ ला शासकीय ग्रामीण रुग्णालय मोहाडी येथे दुपारी २ वाजता आयुष्यमान भव आरोग्य सेवा या कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा घेण्यात आला. कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्ताविक वैधकीय अधिक्षक डॉ.निशा भावसार यांनी सांगितली व अनेक योजना बाबत मार्गदर्शन केले. तत्पूर्वी आयुष्मान भव अभियान अंतर्गत शासकीय ग्रामीण रुग्णालय परिसरात सकाळी ११ वाजता आरोग्य शिबिराचे उद्घघाटन नगराध्यक्ष छाया डेकाटे यांच्या शुभहस्ते तर ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

याप्रसंगी दैनिक पत्रिकाचेयशवंत थोटे, नरेंद्र निमकर, सिराज शेख, डॉ.निशा भवसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दुपारी २ वाजता आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिबिर कार्यक्रम पार पडला. या शिबिराच्या माध्यमातून माताबाल आरोग्य,लसीकरण,पोषण सल्ला,आरोग्य तपासणी, संदर्भ सेवा, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी या उपक्रमांचा ५०० जणांनी लाभ घेतला. यावेळी सुभाष गायधने, पवन चव्हाण, डॉ.चुटे,डॉ.नाईक, डॉ.नळंगे, डॉ.संजय करपाते, डॉ.राकेश रोगे, डॉ.मेश्राम, डॉ.अरविंद साखरे, डॉ.शैलेश गजभिये, डॉ.रोहित मुनघाटे सहायक अधीक्षक देवानंद आजापुजे, कनिष्ठ लिपिक गावंडे, मेश्राम, अधिपरीचारिका अंकिता रामटेके, जयश्री झझाड, प्रगती वडते, दुर्गा मोहतुरे, नांकुरे, वैशाली पाटिल, कीर्ती शर्मा, शनानाज पठाण, आशिष कोरे, वृंदा शहारे, पुरण मेंढे, टोंगसे, शिशुपाल खंडाते प्रामुख्याने हजर होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद गुणेरिया, पिंकी बघेले, गजानन बिलबिले पुरुषोत्तम चौधरी यांनी सहकार्य केले. संचालन व आभार संतोष भुरे यांनी केले. ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मोहाडी तालुक्यात १३ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये आयुष्यमान भव ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक आरोग्यसेवा मोफत दिल्या जाणार आहेत. पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून त्यांना आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड,सिकलसेल जेनेटिक कार्ड वाटप केले जाणार आहे. आरोग्यविषयक जनजागृती व्हावी, सुविधांची माहिती मिळावी, यासाठी मोहिमेत विविध उपक्रम उपक्रम राबवले जाणार आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *