गावाच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी : खा. प्रफुल पटेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील नागरिकांनी राष्ट्र- वादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेऊन गाव विकासाची जबाबदारी सोपावली आहे या विश्वासाला तडा न जाऊ देता गाव विकासासाठी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांनी कामाला लागावे. विकास कामात कसलेही राजकारण आड येऊ देऊ नका, गावाच्या विकासासाठी मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे असा कर्णमंत्र खासदार प्रफुल पटेल यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला. आज राजाराम लॉन, तुमसर येथील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार मेळावा खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी खासदार पटेल पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. शेतकरी असो की सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करीत असतो. गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यात आज घडीला जी हरित क्रांती पाहायला मिळत आहे हे कोणामुळे सध्या झाले हे सांगण्याची गरज नाही हे सर्वांना माहिती आहे.

औद्योगिक क्रांतीलाही चालना देण्याचे काम काही वषार्पूर्वी करण्यात आले मात्र विरोधकांच्या हातात सत्ता गेल्यांनतर ती कामे रखडून पडली आहेत परिणामी आज जिल्ह्यात रोजगाराची समस्या निर्माण झाली आहे. परंतु गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कधीही मागे राहणार नाही याची मी ग्वाही देतो. गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम तुमच्या हातात आहे यात कोणतीही अडचण आल्यास आपणकोणत्याही परिस्थितीत मागे पडणार नाही म्हणून सरपंच असो कि सदस्य यांनी गावाच्या लहान सहान समस्यांकडे लक्ष केंद्रित करून पुढाकार घ्यावा असाही सल्ला खासदार प्रफुल पटेल यांनी दिला. यावेळी खासदार पटेल यांच्या सोबत नानाभाऊ पंचबुद्धे, आमदार राजुभाऊ कारेमोरे, मधुकर कुकडे, प्रशांत पवार, धनंजय दलाल, सुनील फुंडे, देवेंद्रनाथ चौबे, रामदयाल पारधी, देवचंद ठाकरे, विठ्ठल काहलकर, धनेंद्र तुरकर, राजेश देशमुख, राजकुमार माटे, ठाकचन्द मुंगुसमारे, रितेश वासनिक, उमेश तुरकर, योगेश सिंगनजुडे, राजू देशभ्रतार, राजेंद्र ढबाले, सुनील थोटे, गुलराज कुंदवाणी, सदाशिव ढेंगे, विक्रम लांजेवार, सचिन गायधने, रंजनाताई कारेमोरे,

रिताताई हलमारे, नेहा शेंडे, रेखाताई ठाकरे, प्रेरणाताई तुरकर, शुभांगी रहांगडाले, मिना रहांगडाले, सुषमाताई पारधी, सरोज भुरे, पमा ठाकूर, अश्विनी थोटे, नेहा मोटघरे, कविता साखरवाडे, खुशालता गजभिये, जयश्री गभणे, श्रुती कावळे, भोजवंता धुर्वे, राधा गौपाले, दीपिका गौपाले, गौशायी भगत, तिलक गजभिये, प्रदीप भरणेकर, सुमित मालेवार, सलाम तुरक, यासीन छवारे, आफताब रजवी, सागर गभणे, गोवर्धन किरपाने, संजय डुंभरे, सचिन बावनकर, गोल्डी घडले, जाकीर तुरक, उमेश बिंजेवार, संकेत गजभिये, पिंटू तरारे, मोनू तरारे, नानू परमार, यादोराव पटले, खेमराज रहांगडाले, गणेश बनकर, राजू लंजेवार, गजानन लंजेवार, संजू रहांगडाले, प्रशांत रहांगडाले, जयपाल विठुले, कृषि खोब्रागडे, देवेंद्र सहारे, हीराचंद पुरमकर, सुमित गौपले, अवि पटले, माणिकराव ठाकरे, मधू अदमाते, अविनाश कोंडेवार, दिनेश तुरकर,अनिल टेकाम, मनोहर कावळे, सुधीर फुंडे, श्रीराम ठाकरे, सियाराम बोकडे, आकाश राऊत, शिवचरण बिसने, कृष्णा बनकर, राजेंद्र बघेले, गणेश ठाकूर, मनोज वासनिक, अरुण गजभिये, मनोज झुरमुरे, दीनदयाळ टेम्भरे, गजानन कटरे, रामभाऊ पटले, वासन कावळे, अजय भुसारी, छत्रपाल पारधी, ओमकार रहांगडाले, राहुल भवसागर, उमाताई पटले, आम्रपाली पटले, राजेश रहांगडाले, दीपमाला भवसागर, लेखन मोरे, दिनेश मेश्राम, नरेश राऊत, विजय पटले, विनोद ठाकरे, भूपेंद्र पटले, दिलीप ढबाले, रमेश ढेंगे, आशिष ढबाले, मंदा गोटेफोटे, सुनीताताई मोहनकर, कादर अन्सारी, बिदू मोरे, यादोराव बोरकर, चंद्रसेन बन्सोड, धनेंद्र कुंभरे, भक्तराज राणे, छगनलाल पारधी, मनोज टेम्भरे, शरद पारधी, रमेश उईके सहित तुमसर तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *