२६ जानवारीला आत्मदहन करण्याचा शेतकºयाचा इशारा

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा : जमिनीचे भूसंपादन न करता अवैधरित्या शेतातून डांबरीकरण रस्ता बनविण्यात आला. याला तब्बल ३ वर्ष लोटूनही जमिनीचा मोबदला देण्यात आला नसल्याने येत्या २६ जानेवारीला (प्रजासत्ताकदिनी) आत्मदहन करणार असल्याचा इशारा पिडीतग्रस्त शेतकरी प्रकाश सोमाजी नाकतोडे यांनी दिला आहे. तसेच यातील जिल्हा परीषद बांधकाम विभागातील व प्रधानमंत्री सडक योजनेतील दोषी अधिकाºयांवर गुन्हे दाखल करुन सदर रस्त्याची चौकशी करावी अशी मागणी पिडीतग्रस्तांनी केली आहे.

सविस्तर असे की, कोणत्याही प्रकारचा शासकीय रस्ता नसतांना व ग्राम पंचायतीचा ठराव न घेता तसेच तलाठी कार्यालयाकडून नकाशासुद्धा न घेता, जिल्ह्याधिकाºयांच्या आदेशाला धुडकावून शासकीय नियमाची पायमल्ली करुन जिल्हा परीषद आणि प्रधानमंत्री सडक योजनेच्या अधिकाºयांनी चक्क शेतकºयांच्या शेतातून अतिक्रमण करीत डांबरीकरण रस्ता बनविल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यात येत असलेल्या परसोडी (पाऊदवना) येथे घडला आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश सोमाजी नाकतोडे आता मोबादल्यासाठी प्रजासत्ताकदिनी शोले स्टाईल विरुगिरी आंदोलन करुन आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तलाठी साजा क्रमांक-१२ तई (बु) मौजा परसोडी (पाऊदवना) येथील गट क्रमांक १५५ /१ आराजी १ हेक्टर ३ आर.जमीन प्रकाश नाकतोडे यांची सासु आणि पत्नीच्या नावे शेतजमीन असून सदर शेतजमीनी मधुन कोणताही शासकीय रस्ता नसतांना जिल्हाधिकारी यांचा आदेश धुडकावून शासनाच्या नियमाची पायमल्ली करीत, भूसंपादन न करता व ग्राम पंचायतीचा कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता तसेच तलाठी कार्यालयाकडून नकाशा न घेता, सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परीषद भंडारा यांनी माती काम केले.

यानंतर २०१२ च्या शासन निर्णयानुसार या रस्त्याला २००१ ते २०२१ ग्रामीण मार्ग किन्ही ते ६४ व ११५ असे आणि प्रधानमंत्री सडक योजना कार्यालय भंडारा यांनी शासकिय परीपत्रकाप्रमाणे शेतजमीनीचे भूसंपादन न करता रस्ता तयार करीत होते. या दरम्यान रस्ता तयार होत असतांना प्रकाश नाकतोडे यांनी रस्ता अडविला होता. त्यावेळी प्रधानमंत्री सडक योजना येथील कार्यकारी अभियंत्यांनी रस्त्याचे बांधकाम बंद करण्यात आले आहे. असे पत्र जिल्हा परिषदेला दिले व काही दिवसात हेतुपुरस्सर मुजोरीने रातोरात रस्त्याचे बांधकाम करून ठेकेदाराला बील देण्यात आले आहे. यामध्ये तसेच अद्यापपर्यंत त्या शेतजमीनीचा मोबदला देण्यात आलेला नाही. तेव्हा त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सा. बां. विभाग भंडारा, कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री सडक योजना विभाग भंडारा, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, पोलिस स्टेशन या सर्वांना तक्रारी देवूनसुध्दा तीन वर्षांपासुन न्याय मिळाला नाही. तेव्हा येत्या आठ दिवसात शेतजमीनीवरून गेलेल्या रस्त्यावर तोडगा काढून मोबदला देण्यात आला नाहीतर पिडीतग्रस्त शेतकरी प्रकाश नाकतोडे यांनी प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *