हातपंप यांत्रिकींचे नोव्हेंबर पासून मानधन थकीत

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : हातपंप यांत्रिकी कर्मचाºयांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली. मोहाडी तालुक्यातील ८५० हातपंप दुरुस्ती करण्यासाठी एन. एस. मोटघरे, मनोहर शेंडे, अजय पडोळे, शिवकुमार सनतपूरे, तेजराम जांभूळकर, दिलीप राणे, वसंता झंझाड, शकपाल गायधने या आठ हातपंप यांत्रिकी कर्मचाºयांची नियुक्ती मोहाडी पंचायत समितीने केली आहे. त्यांना कधीच महिन्याला दहा हजार रुपये मानधन दिले जाते. तथापि, त्यांना कधीच महिन्याकाठी मानधन मिळत नाही. आता तर त्या कर्मचाºयांच्या हातात नोव्हेंबर २०२२ पासून मानधन मिळाले नाही. प्रशासन त्या कर्मचाºयांच्या सहनशीलतेची परीक्षा बघत आहे.

मानधन मिळण्याबाबत बुधवारी सभापती रितेश वासनिक यांच्यासमोर त्या कर्मचाºयांनी आपलीकैफियत मांडली. त्यात असे माहिती पडले, नोव्हेंबर व डिसेंबर -२०२२ या दोन महिन्याचे मानधन पंचायत समितीला येवून पडले आहेत. मानधन आल्यानंतर बिल लेखाविभागात घालण्यात आले आहेत. परंतु, मानधन आॅनलाइन प्रणालीने करायचे आहेत. त्यामुळे त्या आठ हातपंप यांत्रिकी कर्मचाºयांचे मानधन अडून पडले आहे. कर्मचाºयांनी लागणारे दस्ताऐवज पंचायत समितीला दिले आहेत. तथापि, आयडी दोन वेळा करूनही झाली नाही. त्यामुळे त्यांचे मानधन अडून पडले आहे असे पंचायत समितीचे कर्मचारी पवन राठोड यांनी सांगितले. शुक्रवारी बिल कसे बनवायचे याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे त्या आठ हातपंप यांत्रिकी कर्मचाºयांचे मानधन अडून पडले आहे. पण, नियमित मानधन दिले जावे अशी मागणी त्या आठ हातपंप यांत्रिकी कर्मचाºयांनी सभापती रितेश वासनिक यांच्याकडे केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *