‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय भंडारा येथे गुरुवार दि. २५ मे रोजी जयंत राजाराम पाटील यांच्या सुचनेनुसार “एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी” महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची बैठक आयोजीत करण्यात आली. जिल्हा देशाच्या, राज्याच्या जिल्हयाच्या तालुक्याच्या, गावातल्या, वार्डाच्या सामाजीक, आर्थिक, आणि राजकिय सद्यस्थितीबाबद वैचारीक चर्चा करण्यात आली व कार्यकत्यार्ना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांमध्ये महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीर्ची शहर अध्यक्षा सौ.मंजुषा बुरडे, पं.स. सदस्य महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची जिल्हाध्यक्षा श्रीमती सौ. किर्ती गणविर, पं.स.सभापती सौ. रत्नमाला सरीताताई मदनकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी एक तास बैठक आयोजीत करून चेटूले, ग्रामपंचायत सदस्य सौ.हर्षिला कराडे, किर्ती कुंभरे, सौ. संगिता चव्हाण, सौ. विद्या साखरे व मोठया संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.