राज्य उत्पादन शल्क विभागाच्या परीक्षत गरपकार करणाºया विद्याथ्याविरुद्ध गन्हा नोद

रमाकांत खोब्रागडे/भंडारा पत्रिका तिरोडा : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पद भरती करता तिरोडा येथील राजीव गांधी आयटीआय मध्ये परीक्षा देण्यास आलेले विद्यार्थ्यांने परीक्षेत गैरप्रकार करण्याचे हेतूने इलेक्ट्रॉनिक साधने आपल्या सोबत परीक्षा हॉलमध्ये नेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्या विद्याथ्यार्चे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग नागपूर द्वारे लघुलेखक, जवान ,वाहन चालक व परिचर पदाकरता राजीव गांधी आयटीआय तिरोडा येथे परीक्षा केंद्र असून या केंद्रावर ८ जानेवारी ते १४ जानेवारी पर्यंत होणारे परीक्षेकरिता १३ जानेवारी रोजी दुपारचे सत्रात परीक्षेचे हॉलमध्ये दाखल होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येत असता एका विद्याथ्यार्ची हालचाल संशयास्पद वाटल्यावरून या विद्यार्थ्यांची विचारपूस केली असता त्यांनी आपले नाव धीरज महासिंह सुंदडे वय १९ वर्ष रा. टाकळीवाडी पोस्ट औरंगाबाद कंटोनमेंट तालुका गंगापूर असे सांगितले. विद्यार्थ्यांची तपासणी केली असता त्याच्याकडे संशयास्पद वस्तू असल्याचे संशय आल्यावरून त्याची मेटल डिटेक्टर द्वारे तपासणी केली असता त्याचे कडे मोबाईल फोन ,ब्लूटूथ डिवाइस मिळून आल्याने या विद्याथ्यार्चे विरोधात तिरोडा पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड आणि इतर परीक्षांमध्ये गैरव्यवारांना प्रतिबंध अधिनियम १९८२ चे कलम ७ नुसार तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन विद्यार्थ्यास ताब्यात घेऊन पुढील तपास हवालदार श्रीराम टेंभरे करीत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *