उपविभागीय पोलीस अधिकाºयांची तक्रारदाराला शिवीगाळ करून मारहाण

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात एका अधिकाºयांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मिता राव यांच्या सांगण्यावरून जितेंद्र आग्रोया या व्यक्तीला दिनांक २ जानेवारी ला कार्यालयात बोलावले होते. मात्र काही कारणास्तव आग्रोया कार्यालयात येऊ शकले नाही नंतर आग्रोया हे ता.१० जानेवारी रोजी ४ ते ४.३० च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना कोणतेही प्रश्न नं विचारता उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आग्रोया यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून गालावर तीन-चार थप्पड मारून गैरकृत्त्य केले व तू आपल्या मुलाला मद्य प्राशन करतो असे अनेक वेगवेगळ्या प्रकारे कृत्य संबंधित अधिकाºयांनी केले असल्याचा आरोप जितेंद्र आग्रोया यांनी पत्रकार परिषदेत करत संबधित दोषी उपविभागीय पोलिस अधिकाºयावर कार्यवाही करण्याची मागणी आग्रोया यांनी पोलीस अधिक्षक यांना दिलेल्या लेखी तक्रारी विषयी सदर माहीती पत्रकार परिषेदेतुन दिली. प्रकरण असे कि,आग्रोया यांचे , कौंटुबिक, पारिवारिक वादाचे प्रकरण न्यायालयात न्यायाधीन असून या प्रकरणासंबंधित आग्रोया यांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी कार्यालयात बोलावुन दिनांक १० जानेवारी रोजी अर्जदाराला बंद खोलीत काहीच नं विचारता अश्लील शिवीगाळ करत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी गालावर मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन हिसकावून फोन मधील बँकिंग अ‍ॅप्स से पासवर्ड विचारण्यात आले व त्यांचा मोबाईल त्यांच्या मुलीला देण्यात आले आणि त्यांना आपल्या मुलीची माफी मांग असे बोलण्यात आले व जर माफी मागणार नाही तर तुला कोणत्याही प्रकारणात फसवून तुला मुख्यमंत्री सुद्धा वाचवणार नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मीता राव यांनी धमकी दिली.त्यानंतर त्यांना धक्के मारत कार्यालयांच्या बाहेर काढण्यात आले.

नंतर आग्रोया यांनी आपल्या भावाला फोन करून सर्व आपबितीसांगितली त्याच्या भावाने त्याला दवाखान्यात नेले व उपचार केला या प्रकरणी त्यांनी तुमसर पोलिसात धाव घेतली व सर्व प्रकार सांगितला त्याचा बयान पोलिसांनी घेतला असल्याचे आग्रोया यांनी सांगितले.त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी आग्रोया यांचा मोबाईल हिसकावून व पासवर्ड विचारून तक्रार दाराच्या बॅक आॅफ बडोदाच्या खात्यातुन सात हजार सातशे रुपये व युनियन बँक खात्यातुन डेबिट झाल्याचे पत्रकार परिषदेतुन माहीती दिली. त्यानतर तक्रारदारांनी पोलीस अधिक्षक भंडारा यांना लेखी तक्रार करत व संबंधित अधिकाºयावर कार्यवाही करण्याची मागणी केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत तक्रारदाराचे भाऊ धर्मेंद्र आग्रोया, मुलगा ओम आग्रोया, निरंजन प्रजापती, भुपेंद्र लांजेवार, प्रमोद तितिरमारे,आदी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *