पूर्व विदर्भाच्या काशीत भाविकांची उसळली गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : पूर्व विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया दुगार्बाई डोह तीर्थक्षेत्रावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळून आली .या तीर्थक्षेत्रात नवसाची पूर्तता करणाºया व नवसाची मागणी करणाºया भाविकांची मोठी गर्दी होती .या यात्रेत पूर्व विदर्भासह, छत्तीसगड, मध्यप्रदेशातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित झाले. देवीच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्रात आलेल्या ग्रामस्थांनी आस्थेने स्नान करून देवीची पूजा अर्चना केली, चुलबंद नदीच्या तीरावर दुर्गा बाईच्या डोहावर मोठ्या प्रमाणात मध्यप्रदेश छत्तीसगढ राज्यातील यात्रेकरू व व्यापाºयांनी हजेरी लावली. यामध्ये आधुनिक युगातही ग्रामीण परिसरात आजही वापरण्यात येणाºया पारंपारिक जुन्या वस्तू दगडी पाटा-वरोटा,खल – बत्ता, पायली,झारे,कढाई,ईरा, शेती उपयोगी लोखंडी अवजारे, सौंदर्य प्रसाधनांची दुकाने विविध प्रकारांची साहित्यांची दुकानांची रेलचेल यात्रेत होती.

तीर्थक्षेत्रात पारंपारिक वस्तूंची दुकाने थाटल्यामुळे ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. देवीचे पोहे काढून आजही विधीवत परंपरेनुसार पूजा करण्याचा प्रकार या तीर्थस्थळी सुरू आहे . आजच्या युगात अंगावर टॅटू गोंदवण्याची प्रथा असून, ग्रामीण भागातही हात-पायांवर नावे आणि विविध प्रकारच्या प्रतिमा गोंदवण्याची प्रथा या यात्रेत पाहायला दरवर्षी मिळते. प्रसिद्ध असलेला घोडा बाजार मात्र काळाच्या ओघात अस्त झाला आहे. साकोली आगाराच्या वतीने अतिरिक्त बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती पोलिसांच्या चोक बंदोबस्त या यात्रेच्या वेळी केला होता अंनिस ,आरोग्य विभाग, कृषी विभाग, यांच्यावतीने जन प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले गेले यात्रेमध्ये श्रद्धा व अंधश्रद्धेचा संगम पाहायला मिळतो आजही येणारे भाविक डोहामध्ये स्नान करून मंदिरामध्ये पूजा अर्चा करून श्रद्धेनुसार मानलेले नवस पूर्ण करतात. (छाया- नाझीम पाशाभाई)

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *