बहुजन समाज पार्टी विधानसभा साकोली तर्फे गाव चलो अभियानांतर्गत तीन दिवसीय जनजागृती मोटारसायकल रॅली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : बहुजन समाज पार्टी विधानसभा साकोली तर्फे गाव चलो अभियान अभियानांतर्गत तीन दिवसीय मोटारसायकल रॅली साकोली विधानसभेत ९,१० आणि ११ मे रोजी जनजागृती मोहीम राबविण्यात आला. यामध्ये महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांनी समतावादी समाजाच्या उभारणीत दिलेले योगदान, वोट ची ताकत, जनतेचे अधिकार आणि कर्तव्य, आणि संविधानात दिलेल्या मुलभूत अधिकारांबाबत प्रबोधन करण्यात आले. जनजागृती मोटारसायकल अभियान लाखांदूर तालुक्यातील मसाळ, दिघोरी, सरांडी, भगडी, मोहरणा आणि पिंपळ गाव सेक्टरमध्येजनजागृती मोटरसाइकिल अभियान राबविण्यात आला.                                       जनजागृती अभियानचा तीसरा आणि आखिरी दिवसाची सुरवात दिनांक ११ मे २०२३ ला दिघोरी सेक्टर मधुन करण्यात आली तरी या रॅलीला मार्गदर्शन म्हणुन शंकरजी भेडांरकर प्रदेश सचिव बसपा, चंद्रमनी गोंडाने जिल्हा झोन प्रभारी, सोपान दिवठे जिल्हा सचिव, स्वपनिल गजभिये विधानसभा अध्यक्ष, विलास नरूले उपाध्यक्ष विधानसभा, कार्तिक मेश्राम कोषाध्यक्ष विधानसभा, मनोज कोटांगले विधानसभा सचिव, लता विलास नरूले जिल्हा परिषद सदस्या, प्रिया ताई शाहरे ,हेमा ताई गजभिये, अशोक नंदेश्वर, नितिन मेश्राम परम पिल्लेवान, जयंत टेभुर्णे यांनी मार्गदर्शन केले. लाखांदूरमध्ये जनजागृती मोटारसायकल मोहिमेचा समारोप झाला. आभार प्रकट स्वपनिल गजभिये यांनी केले. सर्व बाइक रॅली ला यशश्वी करना करिता सर्व लाखांदुर तालुकातिल सर्व बसपा कार्यकर्ते आणि समर्थक यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.