संकटात असलेल्या शेतकºयाला तातडीने भरीव मदत करा – नाना पटोले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे पण या सरकारला शेतकºयांचे दु:ख दिसत नाही. भाजपा सरकारमुळे शेतकºयांवर अवयव विकण्याची वेळ आली असून मुंबईत सरकारच्या दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहे. केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपये मागितल्याचे अर्थमंत्री सांगत आहेत पण जाहीरातबाजी व इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत आणि शेतकºयांना द्यायला नाहीत का? असा संतप्त प्रश्न विचारत शेतकºयांचा उद्रेक सरकारला परवडणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

काँग्रेस मुख्यालय टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, दुष्काळाने शेतकºयांचे कंबरडे मोडले असताना दोन दिवसात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकºयांचे पुन्हा मोठे नुकसान केले आहे. यावर्षीचे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुष्काळ जाहीर करण्यातही भाजपा सरकार राजकारण करतआहे. संकटात सापडलेल्या शेतकºयाला भरीव मदत देऊन सरकारने त्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे पण शेतकºयाला मदत कतानाच सरकार हात आखडता घेत आहे. भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी, निर्ढावलेले सरकार आहे, या सरकारला अधिवेशनात जाब विचारून शेतकºयांना मदत देण्यासाठी काँग्रेस पाठपुरावा करेल. शेतकºयांनी मात्र कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पटोले यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *