राज्यातील विविध प्रकल्पांसाठी १६०० कोटींचा निधी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्यातील पर्यटन वृद्धी तसेच रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी रोप-वे करिता निश्चित केलेल्या ४० ठिकाणांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने सादर करावा, असा आदेश देतानाच राज्यातील ८१ रस्ता प्रकल्पांच्या कामांसाठी १६०० कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केली. भारतीय राजमार्ग अभियंता अकादमी आणि राज्य शासनाचा नगरविकास विभाग यांच्यादरम्यान राज्यातील सहा शहरांतील वाहतूक कोंडी समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी आणि राष्ट्रीय राजमार्ग वाहतूक व्यवस्थापन कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात रोप-वे उभारणीबाबत आज दुपारी सह्याद्री अतिथिगृह येथे सामंजस्य करारावर स्वाक्षºया करण्यात आल्या. यावेळी गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रीय राजमार्ग वाहतूक व्यवस्थापनासोबतच्या सामंजस्य करारातून रोप-वे विकसित केले जातील. राज्यातून ४० प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सहा ठिकाणच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा निधी केंद्र सरकार देईल. राज्य शासनाने प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी जमीन उपलब्ध करून द्यावी.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *