लक्ष्मीपूजनाच्या पुढच्या दिवशी सूर्यग्रहण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : यावर्षीचा दुसरा आणि अखेरचा सूर्यग्रहण मंगळवार दि. २५ आॅक्टोबरला अनुभवायला मिळणार आहे. तब्बल सत्तावीस वर्षांनंतर दिवाळी सणाच्या दिवसांत ग्रहण आलेला आहे. २४ आॅक्टोबरला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुढील दिवशी खग्रास सूर्यग्रहण हा खगोलीय आविष्कार अनुभवण्याची खगोलप्रेमींना संधी उपलब्ध असणार आहे. यावर्षी एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण अनुभवायला मिळाला होता. त्यानंतर आता यावर्षातील दुसरा व अखेरचा सूर्यग्रहण २५ आॅक्टोबरला अनुभवता येणार आहे. भारतात सूर्यग्रहणाची अनुभूती घेता येईल. असे असले तरी सध्या तरी शहरासह राज्यभरात पाऊस सुरु असल्याने ढगाळ वातावरण अडथळा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आकाश मोकळे राहिल्यास २५ आॅक्टोबरलाखगोलप्रेमींना खग्रास सूर्यग्रहण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तब्बल २७ वर्षांनंतर दिवाळीच्या सणादरम्यान ग्रहण आलेला असला तरी सणावर त्याचा काहीही प्रभाव नसल्याचे धर्मशास्त्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सामान्यत: दिवाळीच्या पुढील दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. परंतु यावर्षी सूर्यग्रहणामुळे २५ आॅक्टोबरऐवजी २६ आॅक्टोबरला गोवर्धन पूजा केली जाणार असल्याची माहिती जाणकारांनी दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *