दिवाळीसाठी बाजारात विविधारंगी रांगोळ्यांची रेलचेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय संस्कृतीत रांगोळीला अतिशय महत्त्व आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यात रांगोळी शुभ मानली जाते. त्यामुळे दिवाळीत दारोदारी रांगोळी काढण्याची पद्धत आजही कायम आहे. परिणामी, बाजारात पांढºया रंगाच्या रांगोळीची आवक वाढवली आहे. तसेच रांगोळीला आकर्षक करण्यासाठी विविध रंगाचा वापर करण्यात येत असतो. यासाठी बाजारात विविध रंगात रांगोळीची विक्री होत असते. यात रांगोळीचा लाल, निळा, जांभळा, पिवळा, हिरवा, गुलाबी अशा आकर्षक रंगांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रांगोळी विक्रीस उपलब्ध झाली आहे. रांगोळी बाहेर जिल्ह्यातून आणली आहे. रांगोळी काढण्यासाठी विविध प्रकारच्या नक्षींची पुस्तके विक्रीसाठी आली असून, १० ते ६० रुपयापर्यंत उपलब्ध असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. यंदा रांगोळीची वीस रुपये किलो दराने विक्री होत आहे.

बाजारात ठिपक्यांची रांगोळी काढण्यासाठी विविध रंगात कागद विक्रीसाठी आले असून, ते दोन आकारात उपलब्ध आहेत. तसेच रोलर, पावले, पेन, चाळणी आदी साहित्यालाही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. हाताने रांगोळी काढण्यापेक्षा पेनने रांगोळी काढण्याला प्राधान्य दिले जात असल्याने पेन उपलब्ध विक्रीस आहेत. दरवाजात लावण्यात येणारे पोस्टर, तसेच आधुनिक प्रकारच्या विविध डिझाईनमध्ये उपलब्ध असलेल्या आयत्या रांगोळ्या ३० ते १ हजार रुपये किमतीप्रमाणे आकार व दर्जानुसार उपलब्ध असून, या रांगोळ्यांना मागणी अधिक आहे; तर रांगोळी काढण्यासाठी चाळण्या, रिंग याचीही मागणी होत आहे. या रिंग १५ ते २६ इंचापर्यंत व १० ते ५० रुपये किमतीत उपलब्ध आहेत. निरनिराळ्या प्रकारचे डिझाइन काढण्यासाठी बाजारपेठेत वेगवेगळ्या आकाराचे साचे उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत दहा ते पन्नास रुपयांदरम्यान आहे. स्वस्तिक,वेल, फुले, गणपती, मोर, पिंड आदी आकारातील साचेदेखील विक्रीसाठी आलेले आहेत. या साच्यांची किंमत आकारावर अवलंबून आहे. लहान आकाराचा साचा तीस ते पन्नास रुपये तर मोठा साचा १२० ते १५० रुपयांना आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *