सारस पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यात केवळ गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सारस पक्ष्याचे अस्तित्व शिल्लक असताना रविवारी झालेल्या गणणेतून आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणणेदरम्यान भंडारा जिल्ह्यात केवळ चारच सारस पक्षी आढळून आल्याने या पक्ष्यांच्या अस्तित्वाविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. दरवर्षी जून महिन्याच्या दुसºया आठवड्यात सारस पक्षी गणना घेण्यात येते. यावर्षी घेण्यात आलेल्या सारस गणनेत भंडारा जिल्ह्यात चार वनविभाग संयुक्तपणे गणना करत आहे. २०१७ ला तीन, २०१८ ला दोन, २०१९ ला तीन, २०२० ला दोन, २०२१ ला दोन, २०२२ ला तीन सारस पक्ष्यांची नोंद घेण्यात आली होती. ह्या वर्षी जिल्ह्यातील सारस संख्या एकने वाढून चार झाली आहे. सारस गणनेत जिल्ह्यातील नऊ (४) सारस पक्षी आढळले व त्यांची सारस मित्र, २५ स्वयंसेवकांनी नोंद घेण्यात आली.

जिल्ह्यात भंडारा, मोहाडी व तुमसर तालुक्यातील वैनगंगा व त्याच्या उप नद्यांच्या क्षेत्रातील संभावित सारस अस्तित्व असलेल्या १९ ठिकाणी गणना करण्यात आली. तुमसर तालुक्यातील गोंडीटोला येथील तलाव व लगतच्या शेती शिवारात सकाळी ६ वाजता चार सारस आढळले. ह्यात दोन वयस्क व दोन समवयस्क सारस होते. २०१७ पासून भंडारा जिल्ह्यात नियमित सारस गणना सेवा संस्था गोंदिया व सेव्ह इकोसिस्टेम अँड टायगर (सीट) भंडारा तसेच भंडारा सहभाग घेतला. गणनेत प्रामुख्याने सेवा संस्थेचे अध्यक्ष व गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, भंडाराचे मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अनय नावंदर, सहाय्यक वनसंरक्षक साकेत शेंडे, वरिष्ठ पक्षी अभ्यासक राजकमल जोब, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.जी. रहांगडाले, वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, वन परिक्षेत्र अधिकारी मनोज मोहिते व सेवा तसेच सीट संस्थेचे स्वयंसेवक व वनखात्याचे कर्मचारी सहभागी होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.