स्वच्छता सांभाळीत लसीकरणाला सहकार्य करा, लंम्पी रोगाला पळवा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : देशभरात लंम्पी या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातलेला आहे. त्यामुळे पशुपालकात भीतीचे वातावरण आहे. भंडारा जिल्ह्यात अजून पर्यंत तरी या संसर्गजन्य आजाराची लागण नसली तरी काळजी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनासह पालांदूर येथील प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवयानी नगराळे यांनी पशुपालकांची रात्रीची शाळा घेत लसीकरण सुरू केले आहे. स्वच्छता पाळीत लसीकरण मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉक्टर देवयानी नगराळे यांनी केले आहे. पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत २२ गावांचा कारभार बघितला जातो. येथील शेती हाच मुख्य उद्योग असल्याने ८० टक्के घरात पशुसंवर्धन केले जात आहे.

लंम्पी रोगाविषयी डॉक्टर देवयानी नगराळे यांनी गावागावात जात गावच्या सरपंचाच्या उपस्थितीत पशुपालकांना आजाराविषयी माहिती देत सावध राहण्याकरिता शून्य खचार्तील उपाय योजना सांगितलेल्या आहेत. लसीकरणात पालांदूर, कवलेव- ाडा, मेंगापूर, जेवणाळा व मचारना येथे लसीकरण आटोपलेले आहे. मचारना चे सरपंच संगीता घोनमोडे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने आर्थिक सहकार्य करीत लसीकरण मोहिमेला सहर्ष सहकार्य केले आहे. शासन, प्रशासन स्तरावरून सुद्धा लसीकरणाकरिता मदत मिळत आहे. पशुपालकांनी लंम्पी चर्मरोग विषयी मनात अजिबात भीती न ठेवता गोठ्यातील स्वच्छता आणि लसीकरण केल्यास नक्कीच लंम्पी आजार दूर होत असल्याची ग्वाही डॉक्टर नगराळे यांनी दिली. लसीकरणाकरिता पट्टीबंधक टिचकुले, प्रमोद सहारे सेवादाता, मिलिंद खोब्रागडे सेवादाता, संजय सेलोकेर सेवादाता, प्रशांत उरकुडे सेवादाता ,गुलशन गोटेफोडे सेवादाता, शेंडे सेवादाता आणि गावचे सरपंच यांच्यासहकायार्ने लसीकरण मोहीम राबविली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *