आजपासून वैनगंगा नदीपात्रातील श्री नरसिंह यात्रेला सुरुवात

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : महाराष्ट्र राज्य पर्यटन क्षेत्र असलेल्या श्री लक्ष्मी-नरसिंह मंदिर वैनगंगा नदीपात्र देव्हाडा बु./माडगी जिल्हा भंडारा येथे दरवर्षी प्रमाणे कार्तिक अमावस्या (कोदो अमावास्या) पासून प्रारंभ होत असलेल्या नृसिंह-भगवान यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मिनी पंढरी म्हणून सर्वश्रुत असलेल्या या यात्रेला महाराष्ट्र, मध्य-प्रदेश, छत्तीसगढ व इतरही राज्यांतून अनेक भाविक भक्त नरसिंह भगवंताचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. प्राचीन काळी अति दुर्गम असणारी ही यात्रा आता सोयीची झाली असली तरीही भक्तांसाठी मुलभूत सुविधा अद्याप येथे उपलब्ध नाहीत. लाखोंच्या संख्येने येणाºयाभक्तांना सुविधांच्या अभावाने त्रास सहन करावा लागतो. येथे शुद्ध पिण्याचे पाणी, भक्तनिवास, वृद्ध भाविकांना मंदिरावर पोहचण्याची सोय यासोबतच मंदिर परिसराचा विकास करण्याची आवश्यकता आहे. रामटेक-तिरोडा राष्ट्रीय महामार्ग ७५३ पासून मंदिरापर्यंत असलेला अंदाजे १ किमीचा रस्ता आपल्या अखेरच्या घटका मोजत आहे. टेकडीवर जाने सुकर होईल या हेतूने रामसेतू निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे परमपूज्य श्री संत हनुमानदासजी (अण्णाजी) महाराज संस्थान च्या वतीने कळविण्यात आले. येणाºया भाविकांचे यात्रेत स्वागत भक्तगण लोकांनी नदीपात्रातील जास्त खोल पाण्यात जाऊ नये असे आवाहन संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.

‘आज पासुन सुरु होत असलेल्या यात्रेच्या निमित्ताने टेकडीवर येणाºया सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत. यात्रेच्या समाप्ती नंतर दरवर्षी प्रमाणे होत असलेल्या परमपूज्य श्री संत हनुमानदासजी (अण्णाजी) महाराज पुण्यतिथी महोत्सव निमित्त २५ डिसेंबरला रविवारी गोपालकाला व महाप्रसाद आयोजीत असून यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विशेष उपस्थित राहणार आहेत, तरी आपण सर्वांनी लाभ घ्यावा.’

-रंजन रविशंकर ढोमणे, संचालक मंदिर संस्थान

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *