लाखांदुरातील रुग्णांना आता सेवा देणार ‘आपला दवाखाना’

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी लाखांदूर : रुग्णांना मोफत तपासणी, मोफत उपचार व मोफत औषधीसाठी शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानातून हिंदू हृदयसम्राट बाळास- लाखांदुरातील रुग्णांना ‘आपला दवाखाना’ आता सेवा देणार आहे. १ मे रोजी स्थानिक लाखांदूर येथील शिवाजी नगर टी. पॉइंट चौक परिसरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाच्या उद्घाटनाप्रसंगी ाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ तालुक्याच्या ठिकाणी उघडण्यात आला आहे. १ मे रोजी सकाळी १० वाजता लाखांदूरात या दवाखान्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आॅनलाईन प्रणालीने थाटात उद्घाटन झाल्याने उद्घाटक म्हणुन लाखांदूर न. पं. चे नगराध्यक्ष विनोद ठाकरे, अध्यक्ष म्हणुन पं. स. सभापती संजना वरखडे, प्रमुख पाहुणे म्हणुन न.प. चे उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, नगरसेवक रज्जु पठाण, जि. प. सदस्य डॉ. प्रतिक उईके, नगरसेविकासोफीया अंजुम खॉं पठाण, कांचन गहाणे, पं स. सदस्य पुरुषोत्तम ठाकरे, राहुल कोटरंगे, वैद्यकीय अधिक्षक डॉ दत्ताञय ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ चंदू वंजारी, आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी डॉ शहारे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. लाखांदुरातील आपला दवाखाना मध्ये दुपारी २ ते रात्री १० वाजता पर्यंत बाह्यरुग्ण सेवा मिळणार आहे. सोबतच मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण यासह अन्य आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा व आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका वैद्यकीय अधिकारी वंजारी, संचालन वरीष्ठ उपचार परीक्षक अनुप हातेल यांनी केले. तर आभार कुष्ठरोग तंञज्ञ रविंद्र झोडे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *