मिटेवानी येथील बाबा फरीद यांच्या दर्ग्यावर उर्सचे आयोजन

भंडारा पत्रिका/वार्ताहर गोबरवाही : तुमसर तालुक्यातील मिटेवानी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या पहाडी भागा मधील मिटेवानी पहाडी दरगाह या नावाने प्रख्यात हजरत बाबा फरीद यांची दर्गा आहे. दर्ग्यावर प्रत्येक वर्षी इस्लामिक कैलेंडरच्या तारखेनुसार उर्स निमित्त कार्यक्रमाचा नियोजन केला जातो. दर वर्षानुसार यावर्षी सुद्धा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम धर्माच्या पूजा पाठच्या विधिनुसार सायंकाळी ४ वाजता संपूर्ण मीटेवानी गावात ढोल ताशे वाजत गाजत संदल व चादर फिरवण्यात आली. सायंकाळी ६ वाजतापासुन सर्व हजरत बाबा फरीद यांचे मुरिद भक्त लोकांकरीता दर्ग्यावर लंगरचे आयोजन करण्यात आले होते.

रात्रि ९ वाजता पासून जशने शम्मा महफील कव्वाली चे आयोजन करण्यात आले होते. कव्वाली कार्यक्रमाकरीता आलेले प्रख्यात कव्वाल याकूबघायल बरेलीवाले हे आले असून यांच्यासह तबला वादक सोनप्रभु तांदूलकर, बेंजो वादक अक्षय विरुठकर, ढोलक वादक सोनू महाजन, यांनी कव्वलीचा कार्यक्रम सादर केला. हजरत बाबा फरीद यांच्या उर्स कार्यक्रमामधे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार राजू कारेमोरे, बंडूभाऊ बनकर जि. प. सदस्य, निशा उईके पं. स. सदस्य, वादूमल राने सरपंच मीटेवानी, वाघाडे उपसरपंच मिटेवानीसह गावतील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात सहकार्य म्हणून सुखराम ठाकरे, सुनील कोडवते, सोनु मसराम, क्रिश कोडपे, ममता कोडापे, मंजू मसराम, दुर्गेशवरी कोडापे, यांनी तन मनधनाने आपली सेवा दिली. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम उत्तम रितीने पार पडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.