५८ वीज कर्मचाºयांनी केला मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी वर्धा : जनसामान्याच्या आयुष्य वीजेच्या रुपाने प्रकाशित करणाºया महावितरणचे ५८ कर्मचाºयांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचा संकल्प करीत नेत्रदानाच्या माध्यमातून नगरिकांचे आयुष्य डोळस करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रौशनी फाऊंडेशन नागपूर, महावितरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघ वर्धा आणि जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा येथीलअधीक्षक अभियंता कार्यालय, महावितरण येथे अधिकारी व कर्मचाºयांसाठी नेत्रदान जागरूकता आणि मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले, यावेळी या कर्मचाºयांनी नेत्रदानाचा संकल्प केला. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक आणि जिल्हा रुग्णालय वर्धाचेडॉ. मनोज सक्तेपार यांनी नेत्रदानाबद्दल सखोल माहिती देत उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले आणि जास्तीत जास्त लोकांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचे आवाहन केले. रौशनी फाऊंडेशनचे राजेंद्र जैन यांनी रौशनी फाऊंडेशनचा मरणोपरांत नेत्रदान जागरूकता, उद्देश आणि कार्य याबाबत माहिती देतांना नेत्रदानाची आवश्यकता व महत्व विषद केले. तर महा- वितरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघ वर्धाचे उत्तमराव उरकुडे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून मरणोपरांत नेत्रदान करण्याचे आवाहन केले. जिल्हा रुग्णालय वर्धाचे नेत्रदान समुपदेशक प्रफुल्ल काकडे यांनी देखील नेत्रदानाची माहिती व आवश्यकता याविषयावर विस्तृत माहिती दिली.

कार्यकारी अभियंता स्वप्निल गोतमारेयांनी यावेळी उपस्थित कर्मचाºयांना नेत्रदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रदीप घोरुडे यांनी जास्तीतजास्त लोकांनी मरणोपरांत नेत्रदान केल्यास नेत्रहीन व्यक्तींना जीवन जगणे सुकर होईल, असे सांगितले. या शिबिराचा लाभ महावितरणच्या ७८ अधिकारी आणि कर्मचाºयांनी घेतला. यावेळी ५८ कर्मचाºयांनी मरणोपरांत नेत्रदान करण्याचे संकल्पपत्रभरून दिले आणि ४५ व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबिराच्या आयोजनासाठी रौशनी फाऊंडेशन तर्फे राजेंद्र जैन, गजानन पाटील, भागीरथ साहू, विनय टेकाडे, अशोक गजापुरे प्रभाकर दाणी, दशरथ कळंबे, यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी महावितरण विभागीय कार्यालयातर्फे राजेश मचले व त्यांचे सहकारी आणि महावितरण सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संघ वर्धा तर्फे राम वखरे, विनोद नालवार, दत्तात्रय धर्माधिकारी, विद्याधर पदमावार, अशोक जिराफे यांचे सहकार्य लाभले. जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा नेत्र चिकित्सालय तर्फे डॉक्टर कु. कीर्ती कारोटकर आणि त्यांच्या सहकाºयांनी उपस्थितांची नेत्र तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिलीप यांनी तर आभार प्रदर्शन राम वखरे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *