प्रशासकीय इमारतीतील आरटीओ कार्यालयाला आग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : स्थानिक प्रशासकीय इमारती दुसºया माळ्यावर असलेल्या आरटीओ कार्यालयाला रविवार ११ रोजी सायंकाळी ६ वाजता आग लागली. या आगीत कार्यालयातील महत्त्वाचे दस्ताऐवज, संगणक आणि फर्निचर जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रशासकीय इमारतीत विविध शासकीय कार्यालये असून दुसºया माळ्यावर आरटीओ कार्यालय आहे. आज रविवार असल्याने सर्व कार्यालये बंद होती. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास आरटीओ कार्यालयातील रेकॉर्ड रुमधून धूर आगीचे लोळ बाहेर पडताना दिसले. पहिल्या बंबच्या साहाय्याने आधी आगीवर बाहेरून पाण्याचा मारा करण्यात आला.

मात्र, आग आटोक्यात आली नाही. यानंतर दुसºया वाहनावर असलेल्या कर्मचाºयांनी आतून आगीवर पाण्याचा मारा केला. त्यामुळे आग काही प्रमाणात आटोक्यात आली. सायंकाळी सात वाजतापर्यंत आगीची धग सुरूच होती. आरटीओ कार्यालयातील रेकार्ड रुममध्ये महत्त्वाचे दस्ताऐवज, संगणकसंच, फर्निचर होते. या आगीत सर्वच जळून खाक झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. घटनस्थळी तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट दिली. काही वेळातच आग्रीने रौद्ररूप धारण केले. इमारतीच्या खिडक्यांमधून आगीचे लोळ बाहेर पडू लागले. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती दिली. पालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *