तोतया पोलिसाने वृद्धाला गंडविले

भंडारा पत्रिका भंडारा : रस्त्यावर उभ्या असलेल्या ७२ वर्षीय वृद्धाला एका चोरट्याने पोलिस असल्याचे सांगून ७ ग्रॅम वजनाची अंगठी घेऊन पसार झाला. सदर घटना लाखनी तालुक्यातील खुटसावरी फाट्यावर घडली. सावरी येथील रहिवासी गोपीचंद धमार्जी हरणे हे बाहेरगावी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावरील खुटसावरी फाट्यावर वाहनाच्या प्रतिक्षेत थांबले होते. दरम्यान तेथे दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीने आले व आम्ही गोंदिया पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असून आरोपीच्या शोधात जात असल्याचे सांगिते. चोरटे फिरत असल्याने तुम्ही सुध्दा आपल्या हातातील सोन्याची अंगठी काढा , आम्ही तिला सुरक्षित गुंडाळून देतो असे सांगितले. त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेवून गोपीचंद यांनी ७ ग्रॅम सोन्याची अंगठी हाताच्या बोटातून काढताच ती घेऊन दोन्ही चोरटे तिथुन पसार झाले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *