रमणविज्ञान केंद्राच्या फिरते विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांची भेट

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी:जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वरठी येथे रमण विज्ञान केंद्र नागपूर व तारे जमीन पर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता व स्वास्थ्य विज्ञान यावर आधारित २० प्रयोगांतून अत्यंत सोप्यापध्दतीने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. प्रदर्शनाचे उद्घघाटन एकनाथ फेंडर यांच्या शुभहस्ते सरपंच चांगदेव रघुते यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख अतिथी उपसरपंच अनिता गजभिये, ताराचंद हिंगे, तथागत मेश्राम, प्राचार्या केशर बोकडे, जयप्रकाश गायधने हे होते. प्रदर्शनाला सहायक खंडविकास अधिकारी मारोती भुजाडे, गटशिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, विस्तार अधिकारी विजय आदमने, केंद्रप्रमुख नरेंद्र उरकुडे यांनी भेट देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रमण विज्ञान केंद्राचे विज्ञान समन्वयक शुभम अजमिरे, तंत्रज्ञ श्रीकांत खांडेकर व सहाय्यक चेतन शेंडे यांनी नियोजन केले होते.

हात धुण्याची शास्त्रीय पद्धत, दरवाजा बंद-रोगराई बंद, मुख स्वास्थ्य रक्षा, आणिबाणी व उद्रेक अशा सर्व २० प्रयोगांचे विवेचन जिल्हा परिषद हायस्कूल व विज्ञान हे कनिष्ठ महाविद्यालय वरठी येथील २४ विद्यार्थ्यांनी विज्ञान विभाग प्रमुख वर्षा मेश्राम बोरकर यांच्या मार्गदर्शनात परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थी व शिक्षकांना माहिती दिली. विविध शास्त्रीय प्रयोगांचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. सौरमंडल व समुद्र निर्मिती आधारित चलचित्र दाखविले. या परिसरात असे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी अभिनव विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी मार्गदर्शक ठरल्याचे अनेकांनी आपले मत व्यक्त केले. या प्रदर्शनाला अनेक शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी सहकार्य केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *