प्रदीपच्या हत्यापकरणी दोन आरोपीना अटक

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : शेतातून दूध घेऊन घराकडे जाणा-या प्रदीप लक्ष्मण धांडे या ३५ वर्षीय तरुण गावालगतच्या शेतात बुधवार दि.२२ मार्च २०२२ रोजी मृतावस्थेत आढळून आला. प्रदीप याची हत्या केल्याचा संशय बळावला होता. मोहाडी पोलीसांनी या प्रकरणात दोन आरोपीना अटक केली आहे. मोहाडी तालुक्यातील पोलीस स्टेशन हद्दीत रामपूरमांडेसर येथील प्रदीप धांडे हानेहमी प्रमाणेजनावरांचा दूध काढण्यासाठी शेतावर गेला असतांना घरी अमोल निंबुलकर या तरुणाला परत येत असतांना रात्रीच्या अंधारात अज्ञात आरोपींने डोक्यावर वार करून प्रदीप याची हत्या केली. गावालगतच्या शेतात प्रदीप याचे दि.२२ मार्च रोजी रात्री ९ वाजता दरम्यान दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच मोहाडी पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व तपासाला सुरुवात केली.
दि.२३ मार्च रोजी रामपूर येथील घरालगत राहणारा अमोल निंबुलकर व हिवराज बनकर या तरुणावर संशयाची सुई स्थिरावल्याने पोलीसांनी त्याना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता आरोपी अमोल आणि हिवराज याने प्रदीपची हत्या केल्याची कबुली दिली. मात्र कुठल्या कारणावरुन प्रदीप याची हत्या करण्यात आली, हे मात्र कळू शकले नाही. या प्रकरणात आणखी काही आरोपी आहेत का, याचा तपास पोलीसांकडून केला जात आहे. आरोपींना दिवाणी व फौजदारी न्यायमंदिर मोहाडी येथे नेण्यात आले. न्यायालयाने बुधवार दि.२९ मार्च २०२३ पर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मोहाडी पोलीस स्टेशन ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *