डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मध्यरात्रीपर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी द्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मध्यरात्रीपर्यंत नियमाच्या अधीन राहुन डीजे वाजविण्यास परवानगी द्यावी अश्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने ता.२४ शुक्रवारला देण्यात आले. शासननिर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी, जिल्हयाच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५ दिवस निश्चित करून सकाळी ०६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याकरिता संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केलेले आहे.
यामुळे सण उत्सवाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत दे दणादण डीजे वाजविण्याची संधी चालून आली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीला मध्यरात्रीपर्यंत ध्वनिक्षेप व वाद्य वाजवीण्याच्या परवानगीबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश निर्गमित करावे. अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी भंडारा यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी दिले आहें. यावेळी निखिल कळंबे, आलोक बन्सोड, निलेश डोंगरे, राजेश कळंबे, चैतन्य राने, हरीश मोगरे, अनुप सिंगाडे, अश्विन भवसागर, आयुष निमाळे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.