कर्जाच्या ओजाखाली दबलेल्या शेतकºयाची गळफास घेवून आत्महत्या

लाखांदूर : सकाळच्या सुमारास स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यात घडली. सदर घटना १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०. ३० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील पारडी येथे उघडकीस आली. मुकेश तुकडोजी ताराम वय(४०) रा.पारडी असे घटनेतील मृतक इसमाने नाव आहे. पोलिस सूत्रानुसार, शेती करून स्वत:चा उदरनिर्वाह करणाºया तालुक्यातील पारडी येथील मुकेश ताराम यांनी सकाळच्या सुमारास स्वताच्या राहत्या घरी छपरीत लाकडी फाट्याला नेव्हारपट्टीने गळफास घेवून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. याची माहिती दिघोरी/मोठी पोलिसांना कळताच दिघोरी/मोठी पोलिसांनी घटनास्थळी भेट देत घटनेचा पंचनामा केला.

या घटनेचा पुढील तपास दिघोरी/मोठी चे ठाणेदार अमरदास धंदर यांच्या मार्गदर्शनात पो.हवा.घनशाम कोडापे करीत आहेत. मृतक मुकेश ताराम याने पारडी येथील विविध सहकारी संस्था इथून ३६ हजार रुपये कर्ज तर ६० हजार रुपये हात उसने घेतले होते. आणि या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत त्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविण्याचा अंदाज कुटुंबियांकडून वर्तविला जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.