लाखांदुर बाजार समिती सभापतीपदी काँग्रेसचे ब्राह्मणकर तर पारधी उपसभापती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ अंतर्गत सभापती व उपसभापती ची निवडणूक २३ मे रोजी पार पडली. या निवडणुकीत कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपा राका समर्पित पॅनलचे डेलीस कुमार ठाकरे, प्रमोद प्रधान तर काँग्रेसचे समर्पित करण्याचे डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर उपसभापती पदासाठी भाजपाला राकॉं समर्पित पॅनल अंतर्गत तेजराम दिवट, काँग्रेस समर्पित पॅनलचे देविदास पारधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजप पॅनल अंतर्गत सभापती पदासाठी डेली ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप चे प्रमोद प्रधान तर काँग्रेस समर्पित पॅनलचे डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांनी सभापती पदाचया निवडणूक रिंगणात उभे होते .

प्रमोद प्रधान यांना ७ मते तर डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर यांना ११ मते मिळाल्याने ब्राह्मणकर यांना सभापती पदी म्हणून घोषित केले .तर उपसभापती पदासाठी भाजपचे तेजराम दिवटे तर काँग्रेसचे देविदास पारधी रिंगणात उभे होते यावेळी घेण्यात आलेल्या निवडणुकीत तेजराम दिवटे यांना ८ मते मिळाली तर देवदास पारधी यांना १० मते मिळाल्याने निवडणूक अधिकाºयांनी घोषित केले . सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण गटातील अविनाश शिवणकर, रामभक्त मिसाळ, रजनी घोरमोडे, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातील सुभाष राऊत, लोकेश भेंडारकर, ग्रामपंचायत अनुसूचित जाती गटातील ओमप्रकाश सोनटक्के, इतर मागास प्रवर्ग गटातील मनोहर राऊत, पडत्या व्यापारी गटातील ज्ञानेश्वर बुरडे तर हमाल गटातील मनोज मेश्राम उपस्थित होते. विजयानंतर गुलाल उधळुन आनंद साजरा करण्यात आला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *