शिक्षण विभागाच्या ‘त्या’ परिपत्रकाची होळी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने जुलै २०२३ मध्ये घेतलेल्या निर्णयाविरोधात साकोली तहसील काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, सुशिक्षित बेरोजगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या निर्णयाच्या निषेधार्थ युवा आघाडी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी संत लहरी बाबा मठ ते तहसील कार्यालय साकोली असा भव्य मोर्चा काढून शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. ०७ जुलै २०२३ च्या शासनाने काढलेल्या आदेशाच्या प्रतीची होळी .करण्यात आली. दिनांक ०७ जुलै, २०२३ चा जीआर. रद्द करून जि.प. शाळांच्या रिक्त जागावर सेवानिवृत्त शिक्षकाच्या नेमणुकीच्या ऐवजी, डी.एड., बी.एड., व सुशिक्षित बेरोजगार युवकांना कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याबाबतचे निवेदन साकोली तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद चे शिक्षण सभापती रमेश पारधी बांधकाम सभापती मदन रामटेके साकोली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक कापगते शहर अध्यक्ष दिलीप मासुरकर ,महिलातालुकाध्यक्ष छाया पटले, शहर अध्यक्ष पुष्पा कापगते ,नेहा रंगारी ,जयश्री भानारकर, कुलदीप नंदेश्वर, दिलीप निनावे ,सोनू थानथराटे, साखरे ,एच बी भेंडारकर, लालचंद करंजेकर, ओम प्रकाश गायकवाड ,संदीप बावनकुळे ,दीपक मेंढे, उमेश भुरे, जावेद शेख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते .

०७ जुलै २०२३ च्या शासन निर्णयात सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाºयाला २० हजार मानधनावर प्राथमिक शिक्षण सेवेसाठी नियुक्ती देण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयाचा ऊ.ए,ि इ.ए,ि सुशिक्षित युवक युवती, अंशकालीन शिक्षक वर्ग, घड्याळी तासिका शिक्षक वर्गात तीव्र असंतोष आहे. या निर्णयाने ज्या सुशिक्षितांनी शिक्षण घेतले आहे, ते शिक्षण निरुपयोगी ठरणार असून सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढणार आहे. महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग डी.एड., बी.एड. सुशिक्षित तरुणांची शिक्षण विभागात सोपी भरती करत नाही, निवृत्त कर्मचाºयांची नेमणूक करून शासनाने वेळकाढू धोरण अवलंबिले आहे असा आरोप सुशिक्षित बेरोजगार संघटनेकडून केला जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *