कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या

लाखांदूर: तालुक्यातील मोहरणा येथील शेतकºयांनी स्वत:च्या घरी पंख्याच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविली सदर घटना शुक्रवारी २१ जुलै रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान सुमारास उघडकीस आली. बबन सोमजी नागोसे वय (५५) रा . मोहरना असे मृतक शेतकºयाचे नाव असुन आज त्याच्या कुटुंबातील सर्व व्यक्ती शेतावर रोवणी चे काम सुरू असल्यामुळे घरी कोणीही नसल्यामुळे त्यांनी घरच्याच पंख्याच्या छताला स्वत: गळफास लावून आत्महत्या केली . प्राप्त माहितीनुसार शेतकरी बबन नागोसे यांनी सेवा सहकारी सोसायटी मधून ७० हजार रुपयाचे कर्ज उचलले होते तर हात उसने म्हणून ५० हजार रुपये त्याच्यावर कर्ज होते .त्या कर्जामुळे आत्महत्या केली असावी अशी माहिती आहे. मृतक मोहरना येथील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते .बबन यांना २ पत्नी व १ मुलगा होता .लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शेंडे हे घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि प्रेत ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *