अर्धवट रस्ता बांधकामाचे जागी एकाच दिवशी दोन भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : बीर्सी मार्गावरील मलपुरी रोड जवळ एका शेतकºयाने आक्षेप घेतल्यामुळे रस्त्याचे बांधकाम अर्धवट असून मागील तीन वषार्पासून येथे दहा ते बारा लोकांचे अपघातामुळे जीव गेले असून जनप्रतिनिधी व प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने सततचे अपघात होत असून दिनांक ७ चे रात्री व ८ पहाटे येथे दोन वाहनाला भीषण अपघात झाले मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र या गंभीर समस्ये कडे कोणतेही जनप्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सालई गोंदिया बालाघाट महामार्गाचे सिमेंट रस्ता बांधकामाचे काम बार्बरीक कंपनीतर्फे मागील तीन वषार्पुर्वी करण्यात आले असून अनेक जागी बरेचसे कामे अर्धवट असून याच मार्गावरील बिर्सि मलपुरी मार्गाजवळ एका शेतकºयाचे जमिनीचे प्रकरणावरून शेतकºयांनी प्रकरण न्यायालयात टाकल्यामुळे रस्त्याचे बांधकाम अर्धवट असून येथे दररोज एक दोन अपघात होत असून अपघाताची तक्रार कोणाकडे करायची हा प्रश्न उद्भवत असल्याने अपघात होणारे वाहनचालक गंभीर जखमी झाले तरी या रस्त्याची तक्रार कुठे करावी हे माहीत नसल्याने तक्रार होत नाही मात्र काही महिन्यापूर्वी या रसत्याचे अर्धवट बांधकामामुळे अनेक गंभीर अपघात होऊन दहा ते बारा लोकांचे जीव गेले असून येथे बांधकाम करणारे कंपनीतर्फे रस्ता बांधकाम अर्धवट असल्याचे फलक लावण्यात आले नसून रस्ता किंवा काहीतरी अडथळा असल्यामुळे लावण्यात आलेले ब्लिंकर लाईट मागील अनेक महिन्यापासून बंद असून तसेच येथे डायव्हर्शन करता लावण्यात येत असलेले फलक व इतर संरक्षक साधने व्यवस्थित लावले नसल्याने रात्री येणारे वाहनांना डायव्हरशन लक्षात येत नसून समोरून एखादे वाहन आल्यास या वाहनाचे लाईट मुळे रस्ता व फलक दिसत नसल्याने दररोज अनेक वाहने यावर आदळून अपघात होत असून तीन महिने आधी एका संघटनेने खासदार सुनील मेंढे यांना निवेदन दिल्यावरून खासदारांचे सूचनेवरून बांधकाम कंपनीतर्फे येथे दोन तीन ड्म दोन्ही बाजूला ठेवण्यात आले होते

मात्र अनेक वाहने आदळून अपघात झाल्याने हे ड्रमही आता कुचकामी ठरले असून या मार्गावरून भंडारा, तिरोडा गोंदिया येथील अनेक जणप्रतिनिधीचे सतत जाणे येणे असून देखील या गंभीर समस्येकडे कुणीही जण प्रतिनिधी लक्ष देण्यास तयार नसल्याने सतत अपघात होत असून सात तारखेचे रात्री आठ वाजता चे दरम्यान भंडारा येथील एका पोलीस कर्मचाºयांचे कुटुंबाचे चाकी वाहनाने भंडारा कडे जात असता वाहनास अपघात झाल्याने यातील काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असल्यान तर आठ तारखेचे पहाटे ३ दरम्यान गोंदिया कडून नागपूरकडे जाणारे एरटिगा वाहन क्रमांक एम एच १४ एच आर ३०८९ येथील फलकावर आढळून पलटी मारून वाहनाचे मोठे नुकसान झाले मात्र सुदैवाने या अपघातात गाडीच्या चालकाला कुठलीही दुखापत झाली नसल्याची नोंद तिरोडा पोलीस स्टेशनला करण्यात आली असून या अर्धवट रस्ता बांधकामा करता प्रशासन शासन व जनप्रतिनिधींनी लक्ष देऊन लवकरात लवकर या मागार्चे बांधकाम पूर्ण करावे किंवा अपघात होऊ नये म्हणून आवश्यक संरक्षण व्यवस्था करावी असे परिसरातील नागरिकांची म्हणणे आहे म्हणणे असून दुर्लक्ष करणारे जनप्रतिनिधी बाबत नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *