राज्य कमचाºयाचा सप, नागरीकाची काम रखडली

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : आज दिनांक १४ डिसेंबर पासून महाराष्ट्र सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटने चे आव्हान वरून राज्यात सर्वत्र संपावर गेलेले कर्मचाºयांमध्ये आरोग्य कर्मचारी ही सामील असल्याने सर्वच विभागाचे कार्यालय ओसाड पडली होती तर रुग्णसेवा ही कोलमडली यात तहसीलदारांनीही एक दिवसाची सामूहिक रजा घेतल्याने महसूल विभागाची कामे ही ठप्प झाली होती. जुनी पेन्शन लागू व्हावी या प्रमुख मागणी सह ईतर मागण्या करता आज दिनांक २४ डिसेंबर पासून राज्यातील सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती द्वारे संपाचे आवाहन करण्यात आले होते या संपात आज शिक्षक तलाठी सामील झाले नसले तरी महसूल विभागाचे लिपिक वर्गीय कर्मचारी आरोग्य विभागाचे आरोग्य अधिकारी कर्मचारी यांचे सह भूमि अभिलेख, पंचायत समिती ,पाटबंधारे आदी विभागाचे कर्मचारी सामील झाल्याने सर्व कार्यालये उजाड पडली होती तर या संपात तहसीलदारानीहि एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन केल्याने महसूल विभागाचे कार्यालयाचे कामकाजही प्रभावीत झाली यात उपजिल्हा रुग्णालय यासह तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाधिक कर्मचारी कर्मचारी संपावर गेल्याने तालुक्यातील संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *