नीटच्या परीक्षेत नापास झालेल्या मुलीची आत्महत्या

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय पातळीवरील पात्रता परीक्षा नीट २०२३ चा निकाल जाहीर होऊन काही तासही उलटले नाही तोच आमगाव तालुक्यातील नितीन नगर येथील विद्याथिंर्नींने कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. नीट परीक्षेत आलेल्या अपयशाने खचुन जावून एका १८ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे. सलोनी रवी गौतम (१८) रा.नितीन नगर आमगाव असे या मुलीचे नाव आहे . काही दिवसांपासून सलोनी ही राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा, नीट परीक्षेची तयारी करत होती. काही दिवसापासून ती या निकाला संदर्भात तणावात होती. नुकताच काल रात्री ला नीट चा निकाल जाहीर झाला. रात्रीला सर्व झोपी गेल्यानंतर आपल्या अभ्यास च्या खोलीत ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळ च्या सुमारास तिची आई उठली असता ही बाब लक्षात आली. या बाबत ची सूचना मिळताच पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करिता ग्रामीन रुग्णालय आमगाव येथे पाठविण्यात आले.

या घटनेला घेऊन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एमबीबीएस आणि तत्सम वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सलोनी ही एक कोचिंग कलासेस चालविणारे रविकुमार गौतम यांची मुलगी होती व आमगाव पंचायत समिती सभापती राजेंद्र गौतम यांची पुतणी होती. आणि तिने २०२३ मध्ये इयत्ता १२ वी पूर्ण केली. तिला बारावीत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे नीट परीक्षेतही आपल्याला चांगले गुण मिळतील अशी तिची अपेक्षा होता. पण चांगले गुण न मिळाल्याने या तरुणीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचे जवळील कुटुंबीयांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *