काळी पिवळी-ट्रक चा भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील डुंगीपार ंपोलीस स्टेशन अंतर्गत ये असलेल्या गोंदिया ते कोहमारा मार्गावर पाटेकुर्रा गावाजवळ ट्रक व काळी-पिवळी वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात काळी-पिवळी वाहनातील प्रवासी एका वृद्धाचा जागीच मृत्यू, तर दोन जणांचा गोंदिया येथील रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला. सहा जण जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. १६) सकाळी सव्वानऊच्या सुमारास कोहमारा ते गोंदिया मार्गावरील पाटेकुर्रा येथे घडली. श्यामसुंदर किसनलाल बंग (वय ७८, रा. गोरेगाव), अंबिका गोकूळ पांडे (वय ६३, रा. चिरचाडी, ता. सडक अर्जुनी) व सूरज शंकर मुनेश्वर (वय २४, रा. कालीमाटी, ता. आमगाव) अशी मृतांची नावे आहेत. एमएच ३६/३१११ क्रमांकाचे काळी- पिवळी वाहन कोहमारा येथून प्रवासी घेऊन गोंदिया कडे जात होते, तर एमएच ४०/ वाय ८४८७ क्रमांकाचा ट्रक गोंदिया येथून कोहमाराकडे जात होता.

पाटेकुर्राजवळ ट्रकचा समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने ट्रक काळी-पिवळी वाहनावर आदळला. यात चालकाच्या बाजूला बसलेले श्यामसुंदर बंग यांचा जागीच मृत्यू झाला. अंबिका गोकूळ पांडे, सूरज शंकर मुनेश्वर, साकीर अली अकबर अली (वय ४९, रा. सडक अजुर्नी), वनिता अनिल भेंडारकर (वय २८, रा. चिखली), मनीषा पवनलाल चिखलोंढे (वय २५, रा. गोंदिया), प्रणोल सतीश राठोड (वय १५, रा. भुसारीटोला) व अन्य दोन असे आठजण जखमी झाले. यातील जखमींना गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना जखमींपैकी अंबिका पांडे आणि सूरज मुनेश्वर यांचा वाटेत मृत्यू झाला. जखमी सहा जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद डुग्गीपार पोलिसांनी केली असून, ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अपघाता मुळे जिल्हा रुग्णालयात पोलिस बंदोबस्त लावण्यात आले, आहेपुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *