संख्याबळ एकने कमी पडला अन् अविश्वास ठराव बारगळला

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : पदाच्या लालसेत अडकले की वास्तवाचा भान राहत नाही.मृगजळात फसत जातो. अवास्तविक दिशेने धावत असतो. त्यानंतर सगळं विस्कळीत होते. अशीच अवस्था शुक्रवारी सभापती पदाच्या अविश्वास ठरावादरम्यान दिसून आली. पदाची लालसा अन् सत्तेची खुर्ची भल्याभल्यांना आपल्याकडे ओढायला भाग पाडते. त्यामुळे मागचं अन् पुढचं काही दिसत नाही. धावत -पळत मृगजळात जावून फसतो. जे दिसतं ते खरं नसतं. अशीच अवस्था पंचायत समितीच्या सदस्य प्रीती शेंडे यांच्याविषयी घडली. पदाची लालसेने त्यांनी आपल्याच लोकांचे हात सोडले अन् त्या आता एकाकी पडल्या आहेत. झालं असं, मोहाडी पंचायत सभापती विरुद्ध त्यांनी आपल्या पक्षातील तीन पंचायत समिती सदस्यांना आपल्याकडे वळविले. त्यांच्या सोबतीला भाजपाचे आठ पंचायत समिती सदस्य होते. फुटीरवादी राजकीय पक्षाच्या मदतीने बारा सदस्यांची गुंफण अगदी मजबूत झाली होती. तसा आभासही निर्माण केला गेला.

सभापती पदाचा अविश्वास पारित झाला की आपणच सभापती होणार अशी खात्री प्रीती शेंडे यांना होती. तसे दुरून दिसतही होते. पण,राजकीय खेळात शेवटपर्यंत काहीही होवू शकते याची खात्री अनेकांना होतीच. झालं ही तसंच, राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी (अजीत पवार गट) यांनी आपल्या भात्यातील सर्व अस्त्र वापरले. त्यानंतर जे अविश्वास ठरावाच्या दिवशी दिसले ते अचंबित करणारे होते. अगदी डोक वापरून निकाल हाती येईपर्यंत खेळ सुरू होता. अजीत पवार गटाचे तीन पंचायत समिती सदस्य प्रीती शेंडे यांच्या खेम्यात होत्या. मात्र,जो काही एक दिवसांपूर्वी खेळ झाला त्याप्रमाणे दोन पंचायत समिती सदस्य सभागृहाबाहेर आले. एक सदस्य सभागृहात राहून तटस्थ राहिल्या. अविश्वास ठराव आणलेल्या गटाकडे बाराचे संख्याबळ होते.

राष्ट्रवादी पक्षाचे समिती सदस्य आशा सतिश बोंदरे (खडकी), उमेश मधुकर भोंगाडे (मुंढरीबुज) सभेला अनुपस्थित होते तर वंदना राजू सोयाम (देव्हाडाखुर्द) तटस्थ राहिले. अविश्वासाच्या बाजूने राष्ट्रवादीचे प्रिती कैलाश शेंडे (जाभोरा), भारतीय जनता पक्षाचे उपसभापती विठ्ठल रामा मलेवार(कुशारी), रेवानंद भिवा चकोले(मोहंगावदेवी), विस्मा गुरुप्रसाद सेलोकर (सातोना, छाया रमेश तडस (हिवरा), कौतिका संतोष मंडलेकर (जाब), दुर्गा मनोहर बुराडे (आंधळगाव), जगदीश मोतीराम शेंडे (धोप), कैलास नामदेव झंझाड (हरदोली) या नऊ सदस्यांनी राष्ट्रवादीच्यासदस्यांसोबत बंडात साथ देऊन अविश्वास बाजूने हाथ वरती केले मात्र सभागृहात मतदान करताना भाजपचे आठ व राष्ट्रवादी पक्षाच्या प्रीती शेंडे एक असे नऊच हात वर आले. तर राष्ट्रवादी पक्षाचे सभापतींसह एक पंचायत समिती सदस्यांचा हात वर राहीला. त्यामुळे अविश्वास ठरावासाथीचा संख्याबळ एकने कमी पडला अन् अविश्वास ठराव बारगळला. ही सर्वं खेळी अगदी डोक शांत ठेवून अजीत पवार गटाने खेळली.

अविश्वास ठरावाच्या खेळात आपण जिंकणारच हा विश्वास विरोधी गटाचा खोटा ठरला. राष्ट्रवादी पक्षाच्या प्रीती शेंडे जे स्वप्न बघत होते. ते स्वप्न मृगजळासारखे असल्याचे दिसले. राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या प्रीती शेंडे आता एकाकी पडल्या. त्यांच्या हातात बाजी असताना ती एका दिवसात निसटली. विरोधी गटाने जो जोर लावला त्या बळाला निष्प्रभावी करण्याचे काम सत्ता पक्षाने केला. या अविश्वासाच्या खेळात अजीत पवार गट तूर्त पॉवरफूल दिसून आला. पण, याचे पडसाद पुढच्या विधानसभा निवडणुकीत दिसून येतील. त्यावेळी खरी परीक्षा अजीत गटाच्या राष्ट्रवादी पक्षाची असणार आहे. या खेळात कोण हरले याची प्रतिक्रिया नागरिकांनी अशी दिली.राष्ट्रवादी पक्ष जिंकला अन् दुसरा हरला. पण, कार्यकर्ता अजीत गटाच्या बाजूने उभा आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *