सावित्री व जिजाऊचे प्रेरणा घेत घराघरात महिलांनी एकतरी मावळा घडवावा- लोहित मतांनी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी जवाहरनगर : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, स्त्रियांच्या मुक्तीदात्या, प्रथम महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील योगदान व राजमाता, राष्ट्रमाता मासहेब जिजाऊ यांनी चांगले संस्कार देत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जनता राजा घडवला. हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी मासहेबानी त्यांना प्रेरित केले. राजा कसा असावा यांचे धडे दिले या दोन्ही मातेची प्रेरणा घेऊन आपल्या आई भगिनींनी घराघरांतून एकतरी मावळा घडवावा तरच सावित्री बाई फुले व जिजाऊंना खरी मानवंदना मिळेल असे भावनिक आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतांनी यांनी केले. इंदिरानगर सावरी येथील अंगणवाडी च्या प्रांगणात दिनांक ९ ते १२ जानेवारी पर्यंत सावित्री बाई फुले व राजमाता, राष्ट्रमाता मासहेब जिजाऊ यांची संयुक्तिक जयंती महोत्सव आयोजन करण्यात आले होते. यात ९ जानेवारीला भिमगिरी पहाडी येथून, ब्ल्यू पंथर ढोल ताशा ग्रूप, महिलांची लेझिम, व लहान मुलांचे दांड पट्टा चे सादरीकरण व्दारे, सावित्री बाई फुले व राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचे तैल चित्राचे समता रॅली, या रॅलीचे उद्घाटन ठाणेदार सुधिर बोरकुटे, मदनपल गोस्वामी, रांजेदहेगव सरपंच स्वाती हुमने, खराडी सरपंच आरती हिवसे, भिमराव लाडे, बिट्टू सुखदेव व अन्य मान्यवर यांचे उपस्थित भीमगिरी पहाडी. ते सावरी, इंदिरानगर येथे रॅली ला सुरूवात करण्यात आले.

१० जानेवारी क्रांतीज्योती कलंगी मंडळ, खंडाळा ( निलज) यांचा संगीतमय समाज प्रबोधन कार्यक्रम या कार्यक्रमाचे उद्घाटन दिक्षित आवळे, अश्वदीप गजभिये, प्रा. पुरण लोणारे, सरपंच गिरिश ठवकर, उपसरपंच संदीप नागदेवे, बिट्टू सुखदेवे, व ग्रा.प.सदस्य इत्यादी उपस्थीत होते. ११ जानेवारीला विविध सांस्कृतीक कार्यक्रम व सायंकाळीं अनिरुद्ध शेवाळे यांचे संगीतमय समाज प्रबोधन कार्यक्रम या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक लोहित मतांनी, राजेश बोद्ध, ठाणेदार सुधिर बोरकुटे, भिमराव लाडे, पत्रकार सरवर शेख, शशिकांत भोयर, तर १२ जानेवारी ला सकाळी भजन स्पर्धा, विविध सांस्कृतीक कार्यक्रम, स्नेहभोज व समारोपीय कार्यक्रम तुळशीराम गेडाम, रोशन जांभूळकर, अचल मेश्राम, मनोज खोब्रागडे, भिमराव लाडे, अभ्यंकर बोरकर, भिमराव भावसागर, उमेश टिपले, मोहनिष कांबळे, सोनी खन्ना, रणजित सिंग, राजकुमार मेश्राम, शिलवंत रंगारी, व अन्य मान्यवर यांचे उपस्थीत स्पर्धकांना बक्षिस, मानपत्र देऊन सन्मानित करून मार्गदर्शन करण्यात आले.

या चार दिवसीय कार्यक्रमांचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी आसाराम शेलारे, रवींद्र मेश्राम, नरेश गेडाम, महेश मेश्राम, रमेश गजभिये, रोशन खंडारे, अरविंद कांबळे, गौत्तंम गजभिये, मंगेश रामटेके, जयपाल गजभिये, रणजित गेडाम, सरोज रामटेके, राजकुमार मेश्राम, कमला शेलारे, नेत्रा मेश्राम, स्वाती बर्वे, वर्षा रामटेके, मंजू घरडे, माया रामटेके, नूतन गजभिये, संध्यादेवी मेश्राम, उषा गेडाम, संगीता गेडाम, मळाबाई सांगोळे, हर्षलता हुमणे, वचला मेश्राम, पुष्पा घरडे, ललिता खंडारे, वृंदा रामटेके, व अन्य नागरिकांचे विशेष अथक परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी केले. मुख्य कार्यक्रमाचे सूत्र संचालन अरविंद कांबळे व प्रा शिलवंत मडामे यांनी केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *