पशुधन विकास अधिकाºयासह कंत्राटी चालक एसीबीच्या जाळ्यात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : सालेकसा पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) सरोजकुमार ग्यानीराम बावनकर (५६) व कंत्राटी चालक भुमेश्वर जवाहरलाल चौहाण (३३) यांना ४ हजाराची लाच घेतांना लाचलूचपत विभागाच्या पथकाने १८ मार्च रोजी रंगेहाथ पकडले. तक्रारदाराची मराठवाडा पॅकेजअंतर्गत शेळीगट अनुदान वाटपमध्ये निवड झाली होती. त्यांनी खरेदी केलेल्या शेळ्यांच्या अनुदानाचा पहिला हप्ताच्या ५७,३५० रुपयांचा धनादेश त्यांना मिळाला. त्यानंतर अनुदानाचा दुसºया हप्ताच्या ५७,३५० रुपयांचा धनादेश काढून देण्याकरिता त्यांनी पशुधन विकास अधिकारी बावनकर यांच्याकडे मागणी केली असता, बावनकर यांनी धनादेश काढून देण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रुपये लाचेची मागणी केली.

यासंदर्भात त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १८ मार्च रोजी सापळा रचून पशुधन विकास अधिकारी बावनकर यांनी तडजोडीअंती ४ हजार रुपये कंत्राटी वाहनचालक चौहाण यांच्याकडे देण्यास सांगितले. दरम्यान आरोपी क्रमांक २ वाहन चालक चौहाण याला लाच घेतांना रंगेहाथ पंचासमक्ष पकडण्यात आले. आरोपीविरुद्ध सालेकसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक विलास काळे, पोलिस निरिक्षक उमांकात उगले, अतुल तवाडे, सहाय्यक फौजदार संजयकुमार बोहरे, मंगेश कहालकर, संतोश शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, संगिता पटले, चालक दीपक बाटबर्वे यांनी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *