शहापूर येथिल राष्टÑीय महामार्ग चालता ट्रक पलटला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्ग शहापूर येथील संततधार पावसात उड्डाण पुलावरील मुख्य स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागपुर कडून भंडाराकडे जाणारा ट्रक क्रमांक सी.जे ०४ एन.एम.९४९८ चालता ट्रक डिव्हायडर ओलांडून पलटला, यात ट्रक मध्ये ड्रायव्हर व क्लिनर अडकुन पडले होते. ही बाब बाजार टोली, राम नगर येथील हनुमान मंदिर जवळील, सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळ शहापूरच्या कार्यकर्त्यांनी धाव घेऊन पलटी झालेल्या ट्रक मधील ड्रायव्हर व क्लिनर अडकून पडलेल्यांचे जीव वाचविले. ही घटना २१ सप्टेंबरच्या मध्यरात्री ११.४० वाजता घडली.

घटनेची माहिती सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळ शहापूरच्या कार्यकर्त्यांनी जवाहरनगर पोलिसांना फोन द्वारे माहिती देण्यात आली. लगेच जवाहरनगर पोलीसांनी घटनास्थळ गाठून जीव वाचविलेल्या ड्रायव्हर व क्लिनर ला ११२ क्रमांकाच्या पोलिस गाडीत बसवून ठेवले असता दरम्यान उभ्या पोलिस गाडी क्र. एम. एच. १२ एस. क्यु.२१८२ गाडीला मागून येणाºया होंडा मोटासायकल क्रमांक एम.एच.४० ए.यू.०४३५ ने मागून धडक दिल्याने मोटासायकलस्वार किरकोळ जखमी झाला. मात्र त्याची मोटासायकलचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. या अपघातात घटनास्थळी धाऊन जाणाºया सार्वजनिक आदर्श गणेश उत्सव मंडळ शहापूर च्या सदस्यांनी परिश्रमाने तिघांचे प्राण वाचविण्यात यश आले. मात्र दुहेरी अपघात घडले असतानाही, घटनास्थळी पोलिस येऊनही घटनेची नोंद पोलिस स्टेशनमध्ये नसणे, या विषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *