लाखनी तालुक्यात यंदा ७२ गणेश मंडळांनी केली गणरायाची स्थापना

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखनी : तालुक्यात यंदाही वरुण राजाने डोळे फिरवल्याने दुष्काळाच्या सावटाखाली गणेशोत्सव साजरा होत आहे. मंगळवारी (ता.१९) घरोघरी गणरायाची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली असून, तालुक्यातील दोन पोलिस ठाण्यातंर्गत लाखनी तालुक्या अंतर्गत ७२ सार्वजनिक गणेश मंडळींनी गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. तर ३५ गावांत ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. तालुक्यात मंगळवारी (ता.१९) पर्यंत ७२ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना करण्यासाठी परवानगी घेतली असून, लाखनी पोलिस ठाण्यातंर्गत तालुक्यातील ४१ सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. त्यात लाखनी शहरातील ७ गणेश मंडळांचा समावेश असून, पालांदूरपोलिस ठाण्यातंर्गत ३१ गणेश मंडळे आहेत. लाखनी अंतर्गत १६ आणि पालांदूर पोलिस ठाण्या अंतर्गत १९ असे एकूण ३५ गावांत एक गाव एक गणपतीची आदर्श संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस विभाग लाखनी पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे व पालांदूर सहायक पोलिस निरीक्षक विरसेन चहांडे यांनी दिली आहे.

गणेशोत्सव शांतता, सुव्यवस्थेत व नर्विघ्नपणे पार पडण्याकरिता गणेश मंडळांनी जबाबदारी स्वीकारून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस विभाकडूनकरण्यात आले आहे. गणेशोत्सवात भाविकांच्या उत्साहाला व भक्तीला उधाण येते. रस्त्यावरील गर्दी व वर्दळसुद्धा वाढते. त्यामुळे या कालावधीत महामार्गावर, शहरातील तसेच खेड्यापाड्यातील वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये; तसेच हा सण शांततेत व सुरळीत साजरा व्हावा, यासाठी तालुका प्रशासन व पोलिस दल सज्ज झाले आहे. यावेळी गणेशोत्सव व ईद हे दोन्ही सण एकाचवेळी आल्याने सामाजिक व धार्मिक सलोखा कायम राहावा, कायदा व शांतता, सुवस्थेला कोणताही प्रकारचा धोका उद्धभवणार नाही यांची काळजी घ्यावी तसेच सण आणि उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर लाखनी, गटविकास अधिकारी अरुण गिºहेपुंजे लाखनी, लाखनी पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे व पालांदूर सहायक पोलिस निरीक्षक विरसेन चहांडे यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *