ईळदा आरोग्य केंद्राचे लोकार्पण करा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी अर्जुनी मोर : तालुक्यातील अतिसंवेदनशील, आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ईळदा येथे कोट्यवधी रुपये खर्च करून सुसज्य इमारत साकारण्यात आली आहे. मात्र चार वर्ष लोटूनही नवनिर्मित वास्तूचे लोकार्पण न झाल्याने जुन्या व जिर्ण इमारतीत कारभार सुरू आहे. यामुळे कार्यरत कर्मचारी व नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. २ आॅक्टोबर पुर्वी लोकार्पण व इतर सुविधा उपलब्ध न झाल्यास आंदोलन करण्याच्या भूमिकेवर स्थानिक जि.प. सदस्य ठाम आहेत. ईळदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामावर करोडो रुपये खर्च झाले. चार वषार्पुर्वीच पुर्णत्वास आलेल्या वास्तूचे अद्याप हस्तांतरण व लोकार्पणच झाले नाही.

इमारतील वीज साहित्य चोरीला गेले. काही साहित्याची तोडफोड झाली. येथे आरोग्य सेवा सुरू करण्याच्या उद्देशाने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय राऊत यांच्यासह इतर कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र इमारतीचे हस्तांतरणच झाले नसल्याने कुणीही जबाबदारी घेण्यास तयार नाही. स्थानिक जि. प., पं. स. सदस्य व सरपंच यांनी केंद्राच्या वास्तूचे लोकार्पण करावे,नवनिर्मित वास्तूतील विजेच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेल्या निधीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली होती. अन्यथा गांधी जयंती दिनापासून उपोषण करण्याचा इशारा श्रीकांत घाटबांधे यांनी प्रशासनाला दिला आहे. आरोग्य सुविधेच्या बाबतीत केशोरी परिसर मागासलेला आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून इमारत उभी केली, मात्र लोकार्पण झाले नाहीत्र वीज दुरुस्तीच्या नावावर तीन टप्प्यात पन्नास लाखाचा निधी खर्च केला. शासनाने याची चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी २ आॅक्टोबर पूर्वी लोकार्पण न झाल्यास इमारतीच्या आवारात उपोषण करणार असल्याचे जि.प. सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी सांगीतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *