महाशिवरात्री आध्यात्मिक ज्ञानयज्ञ महोत्सव

यशवंत थोटे मोहाडी : विदर्भाच्या पूर्व टोकावर असलेल्या भंडारा जिल्ह्यातील उत्तर दिशेला मोहाडी येथील सुप्रसिद्ध जागृत माँ चौंडेश्वरी देवीच्या पावनभूमीत शिवरात्री आध्यात्मिक ज्ञानयज्ञ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कैलास राणा शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा मुकूटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दु:ख हारी,तुज विण शंभो मज कोण तारी. मोहाडी पंचक्रोशातील सर्व भाविक लोकांना कळविण्यात अत्यांनद होतो की,देवाधिदेव महादेवाच्या कृपेने व दात्यांच्या मदतीने होत असलेल्या जिर्णोद्धार अपूर्ण कार्यक्रम पुर्ण व्हावा ही सदिच्छा “शिवरात्री आध्यात्मिक ज्ञानयज्ञ महोत्सव” ह.भ.प. गिरीधारी महाराज आंधळगांव व श्री ओंकार वैद्य, रतन गडरीये महाराज यांचे साथसंगतीद्वारे शुक्रवार दि.१७ ते १९ फेब्रुवारी २०२३ पर्यत तीन दिवस साजरा होईल. शुक्रवार दि.१७ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ६ वाजता ध्यानसंबोधन ह.भ.प.रतन गडरिये दहेगांव,अभिषेक नरेंद्र बाळकृष्ण गायधने,बाळा कारंजेकर यांच्या हस्ते,ह.भ.प.ओंकार वैद्य बोथली शिवमहाआरती.सकाळी ७.३० वाजता शिव महाआरती शिवलिलामृत पूजन सचिन गायधने, शिवलिलामृत पूजन गडरीये महाराज. सकाळी ७.४५ वाजता शिवरात्री आध्यात्मिक ज्ञानयज्ञ महोत्सव दिपप्रज्वलन दिनेश निमकर, सकाळी ८.१५ वाजता शिवशंकरजी सामुदायिक आरती. सायंकाळी ५ वाजता ह.भ.प.गिरीधारी महाराज, ह.भ.प.ओंकार वैद्य, ह.भ.प.वाघमारे महाराज, ह.भ.प. रतन गडरिये महाराज, मनराज भुरे, कैलास चौधरी भंडारा. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना संबोधन प्रभाकर पराते श्री गुरूदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामवासी व भाविक भक्त सायंकाळी ७.३० वाजता शिवशंकरजीची सामुदायिक आरती, रात्री ८ वाजता गीतगायन केशवराव पराते, रात्री ९ वाजता किर्तन ह.भ.प.ओंकार वैद्य, रतन गडरिये भजन मंडळ दहेगांव. शनिवार दि.१८ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ६ वाजता ध्यान संबोधन ह.भ.प.गिरीधारी महाराज, सकाळी ७ वाजता अग्रपुजा संदिप ढोमणे हस्ते पंडीत प्रकाश त्रिपाठी द्वारा.वंदनीय कै.भाऊदास निखारमहाराज यांच्या प्रतिमेस शालीनी रामदास थोटे तुमसर,अ‍ॅड.नरेंद्र निखारे व बंधू परीवार जबलपुर.सकाळी ७.३० वाजता शिवशंकरजीची सामुदायिक आरती,सकाळी ९ वाजता रामायण पूजन हस्ते उमेश चिंधालोरे, रामु श्रीराम पवनकर, उमाशंकर बारई, डॉ.विश्वास.रामायण पाठ (सुंदरकांड) गायन रतन गडरिये महाराज, बाळकृष्ण वैद्य, छोटु लेंडे, चिंतेश्वर रोडे, सुनिल कहालकर, पुरुषोत्तम सेलोकर श्री संत तुकाराम महाराज रामायण मंडळ दहेगांव. आशिष पातरे नारायणराव धकाते यांच्या उपस्थितीत. दुपारी ४ वाजता प्रवचन ह.भ.प.गिरीधारी महाराज आंधळगांव. सायंकाळी ६ वाजता सामुदायिक प्रार्थना संबोधन ओंकार वैद्य बोथली, महादेवाचे गीतगायन केशवराव पराते, सायंकाळी ७.३० वाजता शिवशंकरजीची सामुदायिक आरती.रात्री ९ वाजता किर्तनह.भ.प.गिता बालचंद गायधने भजन शिवगौरी भजन मंडळ, नेहरू वार्ड,मोहाडी. साथसंगत संत तुकाराम महाराज भजन मंडळ,दहेंगांव. रविवार दि.१८ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ६ वाजता ध्यान संबोधन ह.भ.प. बलदेव सेलोकर सकाळी ७.३० वाजता शिवशंकरजी सामुदायिक आरती सकाळी १० वाजता शिवपुराण पुजन(समाप्ती).दुपारी १२ वाजता गोपालकाला व किर्तन ह.भ.प.रतन गडरीये महाराज साथसंगत संत तुकाराम महाराज भजन मंडळ,दहेगांव. दुपारी १ वाजता मान्यवराचे आगमन स्वागत व मार्गदर्शन व अहवाल वाचन. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजु माणिकराव कारेमोरे, माजी आमदार चरण सोविंदा वाघमारे, तहसीलदार दिपक करांडे, ठाणेदार प्रदीप पुल्लरवार, बाळू बारई, छाया डेकाटे, सचिन गायधने,आशिष पातरे, सुनील गिरेपुंजे, सेवक चिंधालोरे, दिनेश निमकर, डॉ.अविनाश पुणे, उमेश चिंधालोरे, ओमप्रकाश गायधने, पवन चव्हाण, महेश निमजे, देवश्री विजय शहारे, वंदना कृष्णा पराते, मनीषा गायधने, रेखा मनोहर हेडाऊ, ज्योतिष नंदनवार, पुनम महेंद्र धकाते, यादवराव कुंभारे, दिशा दिनेश निमकर, अश्विनी प्रवीण डेकाटे, कविता विलास साठवणे, सुमन गणेश मेहर, विठ्ठल मलेवार डॉ.विवेक मेश्राम, डॉ.गिरीधर पराते, डॉ.शरद गोमासे, डॉ.प्रशांत थोटे, विजय सव्वालाखे, डॉ.मलिक, ओमप्रकाश चिंधालोरे, गजानन नरवडे, श्रीपत पाटील, मोहन निमजे, आस्तिक घडले, मुरलीधर गायधने, भैय्या गभने, लक्ष्मण गभने, राधेश्याम गाढवे, दिगंबर गायधने, विनोद चिंधालोरे, विनोद बाभरे आदींची प्रमुख उपस्थिती राहील. आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन संयोजक श्रीराम गं.चिंधालोरे, देवस्थान समिती अध्यक्ष संदिप ढोमणे, उपाध्यक्ष धनराज निमकर, सचिव बळीराम चिंधालोरे, सहसचिव अर्जुन बाळबुधे, कोषाध्यक्ष प्रभाकर उपरकर, कार्य.सदस्य नरेंद्र गायधने, रामभाऊ थोटे, नरेंद्र श्रीराम निमकर, वामन चिंधालोरे, महिला समितीचे विणा वसंत चिंधालोरे, सुनीता नरेंद्र गायधने, कविता दिनेश चिंधालोरे, सायत्रा सोनवाणे, सुधा निमकर यांनी कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *