स्व.मनोहरभाई पटेल जयंतीनिमित्त सुवर्णपदक वितरण सोहळ्यात चेतन भैरम सन्मानित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समिती, गोंदिया शिक्षण संस्थेच्या वतीने दि.९ फेब्रुवारी २०२३ रोजी मनोहरभाई पटेल यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त सुवर्णपदक वितरण सोहळ्यात कृषि, सिंचऩ, राजकीय व इतर क्षेत्रात उत्कृष्ट लिखान करणारे देशोन्नतीचे चेतन भैरम यांचा मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी खा.प्रफुल्लभाई पटेल होते तर उद्योगपती सज्जन जिंदल, अभिनेते जॅकी श्राफ, माजी खा.विजय दर्डा यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी, उत्कृष्ट खेळाडू यांना स्वर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.