राख विसर्जनासाठी आलेल्या तरुणाचा वैनगंगेत बुडून मृत्यू

भंडारा पत्रिका/वार्ताहर खरबी : तुमसर तालुक्यातील माडगी वैनगंगा नदी तीरावरील देव्हाळा खुर्द येथील घाटावर राख विसर्जनाकरिता आलेल्या देवरी येथील एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवार दि. ७ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान घडली. तसेच त्याला वाचविण्याकरीता गेलेले तीन तरुण थोडक्यात बचावले. प्रणय शिवराम पराते (२०) रा. सरांडी (तिरोडा) असे मृतक तरुणाचे नाव आहे. देवरी चिंचवड येथील पराते कुटुंबातील मोठे वडील नरेंद्र पराते यांच्या मृत्युपश्चात त्यांच्या राख विसर्जनाकरिता माडगी येथील देव्हाळा घाटावर आलेल्या देवरी येथील एका तरुणाच्या बुडून मृत्यू झाला असून तीन बचावले आहेत. मृत्यू पावलेला प्रणय शिवराम पराते याला वाचवण्याकरिता गेलेल्या संस्कृत सोरते (१७), वेतन संजय सोरते (१८) रा. देवरी चिंचगड, सुनील पराते (३५) रा. देवरी असे बचावलेल्या तरुणांची नावे आहेत. सदर घटनेची माहिती माडगी येथील युवा सरपंच गौरीशंकर पंचबुदे, यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून सर्वतोपरी मदत कार्य केले. तसेच करडी पोलीसांना पाचारण करुन शोधकार्यात बुडालेल्या तरुणाचे मृतदेह दोन तासाच्या प्रयत्नानंतर मिळाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची चौकशी करडी पोलीस करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.