प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सुदामा कनिष्ठ महाविद्यालयात सत्कार समारंभ

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : सुदामा शिक्षण संस्था द्वारा संचालित स्व.सुलोचनादेवी पारधी विद्यालय व सुदामा कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे मार्च-२०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात तालुक्यात व विद्यालयातून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मंगळवार दि.१३ जून २०२३ ला सकाळी ८ वाजता सुदामा कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे सभागृहात आयोजित करण्यात आला. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुदामा शिक्षण संस्थेचे संस्थापक व सेवानिवृत्त प्राचार्य नारायणराव तितीरमारे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, भारतीय जीवन विमा विकास अधिकारी नरेश दिपटे, संस्थेचे सचिव प्रमोद तितीरमारे, रामचंद्र धुमनखेडे, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, मुख्याध्यापक दिनेश पिकलमुंडे, पालक शिक्षक संघाचे सहसचिव दिनेश निमकर, प्राचार्य अविनाश चौधरी हे होते. प्रथमत: पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून दिप प्रज्वलित करण्यात आले.

यावर्षी विद्यालयातून २१५ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले. प्राविण्य प्राप्त श्रेणीमध्ये ४०, प्रथम श्रेणीत ८५ तर द्वितीय श्रेणीत ५० विद्यार्थी तर इतर विद्यार्थी सामान्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. यामध्ये कुशारीची कु.शुभांगी अरुण गायधने हिने ५०० पैकी ४८३ गुण ९६.६० टक्के घेऊन मोहाडी तालुक्यातून प्रथम व जिल्ह्यातून चवथी आली आहे. आंधळगावची कु.आराधना अरविंद कारेमोरे ४७३ गुण ९४.६० टक्के शाळेतून दुसरी आली आहे. मोहाडीची कु.कृतिका प्रीतम डेकाटे ४७१ गुण ९४.२० टक्के प्राप्त करून तिसरी तर मोहाडीची कु.अंशू विनोद अंबुले ४६९ गुण ९३.८० शाळेतून चवथी आली आहे. महालगावची कु.सुप्रिया उमेश बुराडे ४६९ गुण ९३.८० टक्के पाचवी, कु.सुहानी राजकुमार नंदनवार ४६४ गुण ९२.८० टक्के सहावी, चोरखमारीची कु.तन्नू कन्हैयालाल बिरणवार ४६२ गुण ९२.४० टक्के सातवी, पारडीची कु.ज्ञानेश्वरी मनोहर झंझाड ४६१ गुण ९२.२० टक्के आठवी, पिंपळगाव झंझाडची कु.सायली लव झंझाडे ४३६ गुण ९१.२० टक्के नववी, पारडीचा तुषार प्रदीप मते ४४७ गुण ८९.४० टक्के दहावा, खुटसावरीचा साहिल कन्हैयालाल लिल्हारे ४४६ गुण ८९.२० टक्के अकरावा, प्राचिका ग्यानदेव येळणे ४४३ गुण ८८.६० टक्के बारावी, मोरगावची कु.विधी प्रकाश ढबाले व मोहाडीची कु.असका देवराम निखारे ४४२ गुण ८८.४० टक्के तेरावी, महालगावची मनिषा भिमराज बुराडे ४४१ गुण ८८.८० चौदावी, मलिदाची निधी तुषार धुमनखेडे ४३३ गुण ८६.६० टक्के पंधर-ावी, हर्षिता हरिदयाल ढेंगे, कु.लोकेश्या मुरलीधर नंदरधने मोहाडी,स्वरूपा दिगंबर जिभकाटे, कु.रुझाईना नईमखान पठाण मोहाडी, यश जागेश्वर चौधरी, विरेंद्र गोपाल बोंदरे मोहाडी, कु.शिवानी प्रभाकर मारबते, कु.मंजुश्री कैलास शहारे, कु.प्रांजली तुकाराम डोंगरवार मोहाडी, सागर श्रीकृष्ण गभने, प्रीती परमानंद गायधने, तनुजा सुखदास कुकडे,कु.तन्नू नामदेव आगासे, कु.प्रणाली ज्ञानेश्वर आगाशे तर उच्च माध्यमिक विज्ञान शाखेतून चोरखमारीची कु.सलोनी कन्हैयालाल बिरणवार व रोहणाची कु.पूजा राजू तुमसरे हिने कला शाखेमधून प्रथम स्थान पटकाविल्याबद्दल सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प शाल देऊन सत्कार करण्यात आला.

प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना संस्थापक नारायणराव तितीरमारे यांच्याकडून एक हजार पाचशे रुपये रोख बक्षीस देण्यात आले. भारतीय जीवन विमा विकास अधिकारी नरेश दिपटे आणि विमा अभिकर्ता दिपाली बडवाईक यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सन्मानचिन्ह,दुपट्टे,प्लास्टिकचे मोतीहार व पेढे भरून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आयएएस होण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. आयएएस अकॅडमी प्रशिक्षण करून आलेल्या पिंपळगाव झंझाडची बेस्ट निवेदिका कु. सायली लव झंझाडे, कु. पूजा राजू तुमसरे, स्वीटी विनोद मने, मानवता नरेश ईश्वरकर यांनी यावेळी आपले अनुभव कथन केले. याप्रसंगी नरेश ईश्वरकर,रामचंद्र धुमनखेडे, यशवंत थोटे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. संस्थापक नारायणराव तितीरमारे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून भारतीय जीवन विमा विकास अधिकारी नरेश दिपटे यांच्या सततच्या प्रयत्नातून आणि बक्षिसे देण्याच्या उपक्रम राबविण्यात येत असल्याने आमच्या शाळेच्या मुख्यधापक, शिक्षकवृद, विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याची गोडी निर्माण केली.

यामुळे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रावीण्यप्राप्त श्रेणीत येण्याचा मान जिल्हात आघाडीवर असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिक्षक भरत रासे, प्रकाश मते, प्रकाश सिंगनजुडे, किरण देशमुख, हितेश्वरी पटले, विनय शिवरकर, संजीव डोंगरे, रेखा चकोले, कविता तितीरमारे, गजानन तितीरमारे, प्रतिभा खंडाईत, निर्मला नागपुरे, ममता खवास, प्रवीण मोहतुरे, रमेश खोब्रागडे, शिक्षकेतर कर्मचारी प्रदीप सपाटे, विनोद बोरकर, रमेश ठवकर, चुनीलाल आगाशे, नरेश उईके प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अविनाश चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत लोंदासे यांनी केले तर उपस्थिततांचे आभार रुपेश साखरवाडे यांनी मानले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *