विर्शी सरपंच यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले भंडारा जिल्ह्याच्या नियोजित दौºयावर असतांना साकोली तालुक्यातील विर्शी येथील ग्रामपंचायत सरपंच लीलाधर सोनवाणे यांनी नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप मधून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला अच्छे दिन येण्याची झलक विर्शी ईथून सुरू झालेली आहे.

यावेळी जिल्हा परिषद सदस्यां सौ.शीतल जयेश राऊत,अशोक कापगते,सरपंच हरीश दोनोडे, हरगोविंद भेंडारकर,होमराज कापगते, विक्की कापगते,उमेश सुरसावंत, मिलिंद इलमकर, राजकुमार पुराम,देवराम कोडापे, भगवान लांजेवार,गोलू कापगते,रजनी राऊत, सरिता गहाणे,छायाताई लन्जे, कुसुम ताई लांजेवार, दुर्गेश राऊत , पतीराम टेंभुरने, डॉ.निमराज कापगते,शिवा ठाकरे,ब्रम्हदास जांभुलकर, आनंद टेम्भुरने, यशवंत रामटेके, कुलदीप लन्जे, प्रफुलता कोटांगले ग्रा.पं. सदस्य यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला. काँग्रेस पक्षाचा त्याग ,स्नेहाचा पूर्व इतिहास व नाना पटोले यांचे विकास कामांचे नियोजन भावल्याने तरुण सरपंच काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा स्वीकार केला. गोरगरीब जनतेचा विश्वास असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस म्हणत काँग्रेस पक्षाचा दुपट्टा शीतलताई राऊत यांच्या हस्ते हसत हसत खांद्यावर स्वीकारला. विश्रामगृह (सर्किट हाऊस) साकोली येथे पक्षप्रवेश सोहळा उत्साही वातावरणात पार पडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *