मेरी माटी मेरा देश उपक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील मांडेसर ग्रामपंचायतच्या वतीने बुधवार दि.२० सप्टेंबर २०२३ ला सकाळी १०.३० वाजता मेरी माटी मेरा देश अभियान अंतर्गत स्वच्छता ही सेवा म्हणून स्वच्छता अभियान व अमृत कलश यात्रा हे उपक्रम राबविण्यात आले. कलशाचे पुजन करून गावात प्रभातफेरी काढून प्रत्येक घरुन माती तांदूळ उपस्थित मान्यवरांच्या हातून त्या कलसमध्ये माती भरून ग्रामपंचायतमध्ये आणण्यात आले.

याप्रसंगी उपस्थित येथील उपसरपंच रोशन लिल्हारे, ग्रामपंचायत सदस्य कुकवंता सव्वालाखे, शुभांगी अटराहे, ग्रामसेवक सतीश गिते, स्वस्तराशन दुकानदार हेमराज लांजेवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दुर्योधन अटराहे, पोलीस पाटील महेश सव्वालाखे, आशा वर्कर मनिषा सव्वालाखे, अंगणवाडी सेविका शालू सव्वालाखे,मुख्याध्यापक टांगले, कारेमोरे, रोजगार सेवक गोपीकिसन सव्वालाखे उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *