३४ दिवसांनंतर सापडला बेपत्ता विद्यार्थी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पालांदूर : शंकरपट पाहण्याकरिता घरून निघालेला विद्यार्थी, पालक रागावतील या भीतीने ३४ दिवसानंतर सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रयत्नाने भंडारा येथील बेला रस्त्यालगत मिळाला. आधीत्याला भंडारा पोलिसात हजर करून नंतर पालांदूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. अल्पवयीन विद्यार्थी सुखरूप मिळाल्याने पालकांना हायसे वाटले. उमेश तुकाराम नंदरधने (वय १५) रा. पालांदूर हा पालांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकतो. तो पालांदूर शेजारील वाकल येथे शंकरपट पाहण्याच्या निमित्ताने घरी न सांगता निघून गेलाहोता. तिथूनच मित्राच्या मोबाईलवरून मी उद्या थेट शाळेत जाणार असल्याचा फोन केला. मात्र, तो दुसºया दिवशी शाळेत पोहोचला नसल्याने पालकांची चिंता वाढली. नातेवाईकांकडे चौकशी केली तरीपण त्याचा थांगपत्ता नव्हता. शेवटी पालांदूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल करण्यात आली. त्याचा कसून शोध घेण्यात आला परंतु, त्याचा थांगपत्ता लागला नाही. मंगळवारी अचानक बेला येथील सामाजिक कार्यकर्ता शैलेश वैद्य यांना बेला व भंडारा रस्त्यालगत भीतीयुक्त चेहºयाने उमेश फिरताना दिसला. शैलेश वैद्य यांनी त्याची विचारपूस केली. त्यानंतर भंडारा पोलिसांशी संपर्क करून त्यांच्या संपर्क करून त्याच्या पालकाला ओळखीकरिता थेट भंडारा येथे घेऊन आले. ओळख पटल्यानंतर पालांदूर पोलिस स्टेशन येथे त्याची पंचासमक्ष बयान नोंदवून त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. उमेश हा पालांदूरवरून किटाडीपर्यंत व किटाडीवरून अड्याळपर्यंत अनोळखी व्यक्तीला हात दाखवून मोटरसायकलने आला होता. अड्याळवरून भंडारापर्यंत बसने प्रवास केला. भंडारा येथून ट्रकद्वारे नागपूर येथे गेला. नागपुरातील बहिणीचा शोध घेऊन तिच्याकडे राहण्याचा मानस होता. परंतु, तिचा शोध लागला नाही. त्यामुळे तो मिळेल तिथे पोट भरून दिवस काढत होता. अखेर सुपूर्त केले. भंडारा पोलिसांनी पालांदूर पोलिसांशी बेला येथे तो सापडला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *