आधी भक्त झाले चिंब मग परमश्वराला जलाभिषक

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी भंडारा, : धो-धो बरसात असलेला पाऊसही त्यांचा मार्ग अडवू शकला नाही. ं३१ं मंगलवेश आणि खांद्यावर वैनगंगेच्या पवित्र जलाची कावड धरलेल्या भोलेनाथाच्या स्त्री-पुरुष कवडधारी भक्तांनी दाखविलेला उत्साह काही वेगळाच होता. वैनगंगेच्या तीरावरून निघालेली ही कावड यात्रा अद्भूत आणि विलक्षण ठरली. विशेषत्वाने त्यातील चित्ररथ लोकांच्या आकर्षणाचे विषय ठरले. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला श्री कावड यात्रा ं मंडळ भंडाराच्या वतीने खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेली ही यात्रा भंडारेकरांसाठी नक्कीच पर्वणी म्हणावी लागेल. यात्रेचे हे दुसरे वर्ष होते. मागील वर्षी काढलेल्या यात्रेनंतर यावेळी त्यात आवश्यक ते बदल करून यात्रा अद्भूत व्हावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न केले गेले आणि ते सार्थकीही लागले.२० आॅगस्ट रोजी कारधा येथील वैनगंगा नदीच्या तीरावरून जलपूजन करून यात्रेची सुरुवात झाली. पवित्र जल भरून कावडीच्या माध्यमातून खांद्यावर घेत स्त्री-पुरुष भंडारा शहरातील ग्रामदैवत असलेल्या बहिरंगेश्वर मंदिराकडे निघाले.

मंगलवेष परिधान करून सहभागी झालेले हे भाविक भगवान भोलेनाथाच्या भक्तीत लीन झाल्याचे दिसत होते. एकीकडे प्रचंड असा पडणारा पाऊस आणि याच पावसातकुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता कावड घेऊन भोलेनाथांना जलाभिषेक करण्यासाठी निघालेले भक्त यांच्यात जणू काही स्पर्धा लागली होती. मात्र परमेश्वराची आस लागलेल्या भाविकांच्या श्रद्धेपुढे पाऊसही माघारला आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडली. यात्रेत आकर्षण ठरले ते विविध चित्ररथ. भगवान शंकराच्या जीवनावर आधारित चित्ररथांनी लोकांचे लक्ष वेधले. नंदीवर विराजमान असलेले भगवान भोलेनाथ आणि त्यांचे पहा- रेकरी यात्रेच्या अग्रभागी चालताना पाहून अनेकांचे हात आपसूकच त्यांच्यापुढे जोडले जात होते. बीटीबी भाजी मंडीचे अध्यक्ष बंडू बारापत्रे यांनी नंदीवर स्वार भोलेनाथाचे दर्शन व्हावे म्हणून पुढाकार घेतला होता. विशिष्ट डफ-या आणि त्यावर धरला जाणारा भक्तांचा ताल भाविकांमधील उत्साहाचे दर्शन घडवत होता.

ठिकठिकाणी वाटेत भाविकांसाठी पाणी आणि इतर फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. खासदार सुनील मेंढे हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाले होते. कावडधारी शिवभक्तांसोबत त्यांनी मार्गक्रमण केला. यात्रेदरम्यान भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून श्री कावळ यात्रा मंडळाच्या वतीने स्वयंसेवक चोख बंदोबस्त ठेवून होते. दुसड्ढयांदाच शहरात काढण्यात आली असली तरीही अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि आखणी यामुळे भंडारेकरांना एका चांगल्या धार्मिक सोहळ्याचा अनुभव घेता आला. शेकडोच्या संख्येत असलेल्या कावडधारी भक्तांनी आणलेल्या जलाने भगवान बहिरंगेश्वराला नंतर अभिषेक करण्यात आला. प्रत्येकाने आणलेले जल भगवंताच्या चरणी अर्पण केले गेल्याने ते समाधान भाविकांच्या चेह-यावर दिसून येत होते. आरती आणि महाप्रसादाने या कावडयात्रेची सांगता झाली. यात्रेत वेगवेगळ्या संघटनांची सदस्यही तेवढयाच उत्साहात सहभागी झाले होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *