राकेश मिश्रा हत्याकांड प्रकरणी पुण्यातून ५, नागपुरात १ जेरबंद

भंडारा पत्रिका/ प्रतिनिधी नागपूर, : राकेश मिश्रा याच्या हत्येप्रकरणी ५ आरोपींना पुणे येथून तसेच एका आरोपीस नागपुरातील गुन्हे शाखा युनिट १ ने हुडकून अटक केली. राकेशचे २-३ महिन्यांपूर्वी आरोपीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. या कारणावरून त्याची हत्या केल्याचे आरोपींनी सांगितले. मात्र, खरे कारण चौकशीत उघड होणार आहे. गणेश ऊर्फ बर्या रामा दांडेकर (राजीवनगर), राहुल ऊर्फ सिनू संजय शिंदे (विदर्भ सोसायटी, अवधूतवाडी, यवतमाळ), देवांश अजय शर्मा (माळीपुरा, यवतमाळ), हसन खान ऊर्फ गब्बर अन्वर खान (इंद्रनगर, शारदा चौक, अवधूतवाडी, यवतमाळ), वेदांत संतोष मानकर (अंबिकानगर, सेजल रेसिडेन्सी कॉलनी, यवतमाळ) व अमीर ऊर्फ अमिरा मुस्तफा शहा (राजीवनगर, हिंगणा रोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. फिर्यादी रवी बच्चन जैस्वाल (राजीवनगर) व राकेश चंद्रकांत मिश्रा (राजीवनगर) हे दोघे ते राहत असलेल्या भागातील पानठेल्यावर 16 रोजी रात्री ९.३०वाजेच्या सुमारास बसले होते. ५-६ हल्लेखोर तेथे आले. त्यांनी चाकू व तलवारीसारह्यया शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत राकेशला पडोळे रुग्णालयात नेले तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

रवीला लता मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवीच्या तकह्यारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चौकशीत मिळालेली माहिती व सायबर तपासात मारेकरी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये लपून बसल्याचे समजताच गुन्हे शाखेचे पथक तेथे गेले आणि ५ आरोपींच्या मुसक्या बांधल्या. सहावा आरोपी नागपुरातच सापडला. त्यांच्याजवळून ५ मोबाईल, तियागो कार असा १००० लाख १७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.आरोपींना एमआयडीसी पोलिसांच्या हवाली करण्यात आले. गुन्हे शाखेच्या यूनिट एकचे पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, सहायक निरीक्षक राजेंद्र गुप्ता, हवालदार बबन राऊत, विनोद देशमुख, नितीन वासनिक, नूतनसिंह छाडी, सुमित गुजर, अंमलदार मनोज टेकाम, सुशांत सोळंके, रितेश तुमडाम, मनोज टेकाम, हेमंत लोणारे, योगेश वासनिक, अजय शुक्ला, सोनू भवरे, रवी राऊत, शिवशंकर रोठे, रवींद्र खेडेकर, चंद्रशेखर भारती यांनी ही कामगिरी केली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *